Home मराठवाडा ऊस संशोधन केंद्राच्या इमारतीच्या नियोजित जागेची अजित पवारांनी केली पाहणी

ऊस संशोधन केंद्राच्या इमारतीच्या नियोजित जागेची अजित पवारांनी केली पाहणी

733

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ऊस संशोधन केंद्र इमारतीच्या नियोजित जागेची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली त्यांच्या सोबत पालकमंत्री राजेश टोपे हे उपस्थित होते.

लक्ष्मण बिलोरे
घनसावंगी, जालना

उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात अजित पवार यांनी अंबड तालुक्यातील महाकाळा येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ऊस संशोधन केंद्र ईमारतीच्या नियोजित जागेची पाहणी केली.तसेच संबंधित अधिकाऱ्यांना काही सूचना देखील केल्या.जालन्यातील महाकाळा येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ऊस संशोधन केंद्राला मंजुरी देण्यात आलेली आहे.या केंद्रास कृषी विभागाच्या मालकीची १२५ एकर जमीन देण्यात आलेली आहे.या संशोधन केंद्रामुळे ऊसाच्या नवीन जाती विकसित केल्या जाणार असून ऊसावर पडणाऱ्या रोगांवर देखील संशोधन केलं जाणार आहे.
२०१३ साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या केंद्रास मंजुरी दिली होती. नंतर युती सरकारच्या काळात जमीन हस्तांतराची कारवाई न झाल्याने या संशोधन केंद्राच्या ईमारतीचं काम रखडलं होतं. अखेर महाविकास आघाडी सरकारने वर्षभरापूर्वी महाकाळा या ठिकाणी ऊस संशोधन केंद्राला मंजूरी दिली.त्यामुळे आज अजित पवारांनी केलेल्या जागेच्या पाहणीनंतर ऊस संशोधन केंद्राचं यापुढील काम वेगाने होण्याची शक्यता आहे.
यावेळी आ सतीश चव्हाण,उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल,तहसीलदार विद्याचरण कडवकर,अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ,जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष निसार देशमुख, बाजार समितीचे सभापती सतीश होंडे, समर्थ बँकेचे उपाध्यक्ष संजय कणके,समर्थ चे संचालक किरण तारख,विकास कव्हळे आदींची उपस्थिती होती.