Home विदर्भ वणी तालुक्यातील शिरपुर हद्दीमध्ये अवैध्य रेती वाहतुकीवर पोलीसांची कारवाई

वणी तालुक्यातील शिरपुर हद्दीमध्ये अवैध्य रेती वाहतुकीवर पोलीसांची कारवाई

952

यवतमाळ / वणी – आज दि.19/06/21 रोजी सायंकाळी 06:30 वा.सुमारास पो.स्टे. शिरपूर हद्दीमध्ये घटनास्थळ ग्राम पुनवट येथे अवैद्य रेती वाहतूक व उत्खनन होत आहे. अश्या गोपनीय बातमी वरून पोलीसांनी रेड केला असता चारगाव ते घुग्घुस रोड वर ट्रॅक्टर चालक सह दोन संशयित इसम अवैद्य रेती ट्रॅक्टर आपल्या मोटर सायकलने पास करतांना मिळून आले. सदर अवैद्य रेती मुद्देमाल किंमत 6000 रूपये व ट्रॅक्टर कीं 5,00000, मो/सा. कीं 40,000 व गुन्ह्यात वापरलेली आरोपींचे तीन मोबाईल कीं 21,000 असा एकूण मुद्देमाल 05,67,000 रु चा पंचसमक्ष मिळून आला. वरून यातील आरोपी व गुन्हयातील मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाई करत आहोत. सदरची कारवाई यवतमाळ जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, सा.पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस सपोनि मुकुंद एस. कवाडे विशेष पथक , वणी व पांढरकवडा उपविभाग यवतमाळ सह पो. ह.वा. / 798 राजू बागेश्वर, Npc जितेश/1172, Npc मुकेश / 1807 , पो.शि. मिथुन /327, पो.शि.निलेश /2284, पो. शि.अजय /2313 सरकारी वाहन चालक पो.ह.वा ., महेश 2496 यांनी केली. पोलीसांच्या कारवाईमुळे परीसरात अवैध रेतीवाहतुक करणार्याचे धागे दणावले आहे.