Home विदर्भ नगर पालिकेत पसरवले चिखल व माती , बिनधास्त कंत्राटदार देतात कमिशन, अधिकारी...

नगर पालिकेत पसरवले चिखल व माती , बिनधास्त कंत्राटदार देतात कमिशन, अधिकारी मस्त व शहरातील नागरीकांचे हाल.

326

.ईकबाल शेख

वर्धा आर्वी नगरपरिषद हद्दीतील भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे शहरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. रस्त्यांच्या दुरवस्थे मुळे पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या गैरसोय ची जाणीव असून सुद्धा नगर पालिका ह्या रस्त्यांच्या सुधारणा करताना दिसत नाही व नागरिकांच्या कुठल्याही तक्रारींची दखल घेतल्या जात नाही.
कंत्राटदाराला कोनाचीच भिती नसल्याचे चित्र दुिसुन येते यात खालुन तर वर पर्यत सर्व यंत्रना हात मिळवणी करुन चालता अश्या चर्चेला उदान आलेले आहे.
नेहमिच वादाच्या भोवर्यात असनारी हि एक हाथि असलेली सत्ता कोनत्या न कोनत्या चर्चेत असते
आर्वी शहरातील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी ह्यासाठी आर्वी शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले व शहरातील रस्त्यांच्या बिकट परिस्तिथी मुळे नागरिकांना होत असलेल्या गैरसोय च्या निषेधार्थ व एक हाती भाजप पक्षाची सत्ता असलेल्या नगरपालिका च्या विरोधात नगरपालिका परिसरात माती व चिखल पसरवण्यात आली.
ह्यावेळी छोटू शर्मा, नगरसेवक रामू राठी , किसन मिस्कन, सागर डाफे, चकोर राणे, अक्षय राठोड, विशाल साबळे, विक्की लसूते,वझाहत खान, दानिश शेख, अंगद गिरीधर,सोनू महाजन, गौरव मोहोड, प्रशांत खरकाटे, नौफिल खान, भूषण पोकळे, अवेझ शेख, मुशरण मुल्ला, ऋत्विक ईखार ,धर्मेश शर्मा, देवेंद्र तळेकर, शेख इरफान, निनाद वानखेडे,सागर शिरपूरकर,अध्यक्ष युवक काँग्रेस आर्वी. हितेश मेन्द्रे, साइराज मेन्द्रे, प्रतीक मुडे,ऋतिक वडणारे, पंकज वडणारे,प्रवीण मोहेंकर,अश्विन जाधव,निलेश देऊळकर उपस्थित होते.