Home विदर्भ पुलगाव येथील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी, अमरावती जिल्ह्यातुन अटक.

पुलगाव येथील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी, अमरावती जिल्ह्यातुन अटक.

330

इकबाल शेख

पुलगाव शहरातील एका नामांकित कपडयाचे दुकानात काम करणारा दत्ता राजेश वानखडे, रा. नांदगाव खंडेश्वर जि. अमरावती हा हरीराम नगर पुलगाव येथे किरायाने राहत असताना त्याने मे 2020 मध्ये हरीराम नगर पुलगाव येथील हिरोहोडा कंपनीची शाईन मोटर सायकल व एप्रील 2021 मध्ये गांधी चौक पुलगाव येथील सिल्व्हर रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल चोरून नेल्या आहे अशी डिबी पथकाला माहिती मिळाल्याने सदर माहितीवरून पोलीस स्टेशनचे डिबी पथक नांदगाव खंडेश्वर जि. अमरावती येथे जावुन आरोपी दत्ता राजेश वानखडे, वय 22 वर्षे, रा. येरड पुर्नवसन, नांदगाव खंडेश्वर ता. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती याचे घरी गेले असता आरोपी हा घरीच हजर मिळाल्याने त्यास पोलीस स्टेशन, पुलगाव येथील चोरीस गेलेल्या मोटर सायकलबाबत विचारणा केली असता, त्याने पुलगाव येथील हरीराम नगर पुलगाव व गांधी चौक पुलगाव येथून दोन मोटर सायकल चोरल्याची कबुली दिल्याने त्याचे ताब्यातुन 1) एक जुनी वापरती सिल्व्हर रंगाची हिरोहोंडा शाईन मोटर सायकल जिचा चेचीस नंबर खोडलेला असुन नंबर प्लेटवरील नंबर खोडलेला महाराष्ट्र 27 सी. जे. 67 असा असुन इंजिन नंबर हा JC36E73290250 असा जिचा क्रमांक एमएच 32 / झेड / 7469 किंमत 15,000) रू. व 2) एक जुनी वापरती सिल्व्हर रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटर सायकल क्रमांक एमएच 32 / जी / 6507 किंमत 10,000 रू.असा 25,000 रू. माल हस्तगत करून पोलीस स्टेशन दोन गुन्हे उघडकिस आणले. पुलगाव येथील सदरची कारवाई श्री. प्रशांत होळकर, मा. पोलीस अधीक्षक, सा. वर्धा. श्री. यशवंत सोळंके. मा. अपर पोलीस अधिक्षक, वर्धा, श्री. गोकुलसिंग पाटील, मा उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव, श्री. रविंद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, पुलगाव यांचे मार्गदर्शनात पोहवा. राजेंद्र हाडके. नापोकों, संजय पटले, पंकज टाकोणे, महादेव सानप, पोकॉ. शरद सानप हे पुढील तपास करीत आहे