Home विदर्भ तळेगाव येथील सत्याग्रही घाटामध्ये चालत्या ट्रकने घेतला पेट , “कोणत्याही प्रकारची जीवितहानी...

तळेगाव येथील सत्याग्रही घाटामध्ये चालत्या ट्रकने घेतला पेट , “कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही”

425

रविन्द्र साखरे

तळेगाव शा :- राष्ट्रीय महामार्ग 6 तलेगाव नजीक अमरावती येथून एम एस 40 B 16 53 क्रमांका चा ट्रक हा कास्टिक सोडा पावडर आणि गठान घेऊन सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान मध्ये अमरावती येथून नागपूर कडे निघाला असता तळेगाव शामजी पंत येथील सत्याग्रही घाटामध्ये अचानकपणे सकाळच्या 12 वाजता च्या दरम्यान मध्ये कबिन च्या खालील भागात वायरिंग शॉट झाल्यामुळे पेट घेतला यामध्ये ट्रक चालक ड्श्याम यादव वय 31 राहणार इलाहाबाद याने ट्रक बाजूला लावून ट्रक मधून उडी घेतली ,घटनेची माहिती तळेगाव पोलिस स्टेशन ला मिळताच पोलीस कर्मचार्यानी घटना स्थळ गाठले त्यांनी नॅशनल हायवे वरील सी डेट कंपनी ला फोन लावून पाण्याचे टँकर बोलावले व तसेच आर्वी येथील अग्निशामक दलाला प्रचारारन करण्यात आले यामध्ये ट्रकची आग आटोक्यात आणली यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही , पुढील तपास तळेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार आशिष गजभिये करीत आहे.