Home मराठवाडा कुंभार पिंपळगाव येथील दुकाना जळीत प्रकरणी लाखोंचे नुकसान होवूनही महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष.

कुंभार पिंपळगाव येथील दुकाना जळीत प्रकरणी लाखोंचे नुकसान होवूनही महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष.

479

.घनसावंगी तालुक्यातीलकुंभार पिंपळगाव येथील मुख्य बसस्थानक समोरील रस्त्यावरील गादी घर , मोटार गॅरेजसह मंडप डेकोरेशन या दुकानांना

आज सोमवारी ,सकाळी दहा वाजेच्या सुमारास शॉटसर्किट होऊन आग लागल्याने या तिन्ही दुकानाचे लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे या बाबतीत महसूल प्रशासनाला कळवूनही* *सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोणी फिरकले नाहीत.

घनसावंगी -लक्ष्मण बिलोरे

येथील वाहेद गादी घर ,बाजुलाच असलेले प्रविण मंङपच्या दुकानातील साऊंड ,स्पिकर मशिन ,मंडप साहित्य मिळुन लाख रुपयाचे नुकसान झाले तर शेजारील दुकानाचे फर्निचर व मोटरसायकलचे स्पेअर पार्ट, महत्वाचे कागदपत्रे जळूनखाक झाले हि आग लागताच दुकान मालक व ग्रामस्थानच्या लक्षात आल्याने धावपळ सुरू झाली दरम्यान ,पाण्याचे टँकर बोलावून घेतले व आग विझवण्याचा प्रयत्न केल्याने आजूबाजूला असलेल्या दुकाना वाचल्या.इतर हानी झाली नाही ,परंतु तो पर्यंत वाहेद गादी घरचे युनूस शेख, प्रविण मंडप डेकोरेटचे श्रीधर संघवी, संतोष तौर ,अजित संघवी यांच्या दुकानातील साहित्याची  राख झाली होती. आश्चर्याची बाब म्हणजे लाखों रुपयांची हानी होवूनही महसूल प्रशासनाने दखल घेतली नाही, सायंकाळी पाच वाजेपर्यंत कुणी ढुंकूनही पाहिले नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.