Home जळगाव शिक्षकांना फ्रन्टलाईन वॉरियर्स घोषित करावे

शिक्षकांना फ्रन्टलाईन वॉरियर्स घोषित करावे

268

केंद्र व राज्य शासनास AIITA ची मागणी

रावेर (शरीफ शेख)

कोरोना महामारीच्या दुसऱ्याला लाटेत निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीत प्रत्येक राज्यात होणाऱ्या मृत्यूच्या तांडव ने हा-हाकार माजला असून दररोज हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. यावर ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन *AIITA* चे राष्ट्रीय अध्यक्ष शेख अब्‍दुल रहीम यांनी चिंता व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की ही परिस्थिती निर्माण होण्यात एकीकडे खाजगी रुग्णालयांची बेजबाबदार वागणूक आहे. तर दूसरीकडे शासनाची अव्यवस्था यास सर्वस्वी जबाबदार आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या अभूतपूर्व परिस्थितीचा सामना करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थाही पुढे आल्या आहेत. व तसेच शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना या संदर्भात विविध जबाबदाऱ्या दिल्या आहेत.

या अनुषंगाने शिक्षकांवर कामाचा दबाव वाढला आहे. जरी शिक्षकांना फ्रन्टलाईन वॉरियर्स म्हणून घोषित केले नसले तरी ते आपला जीव धोक्यात घालून फ्रन्टलाईन वॉरियर्स च्या खांद्याला खांदा लावून दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडत आहेत.
ही सेवा बजावताना देशात वेगवेगळ्या भागांतील अनेक शिक्षक covid-19 या साथीच्या रोगाला बळी पडले आहेत. एकट्या उत्तर प्रदेश राज्यात पाचशेहून अधिक शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तथापि याचा शासनावर काही परिणाम झाला नाही. यावरून असे सिद्ध होते की शासनाने आपली विश्वासार्हता गमावली आहे.म्हणून *आयटा* या बेजबाबदार वर्तनाचा निषेध करते आणि सर्व राज्य सरकारांना विशेषतः उत्तर प्रदेश सरकारशी मागणी करते की मृत झालेल्या शिक्षकांना फ्रन्टलाइन वॉरियर्स म्हणून घोषित करून त्यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक सहाय्यता व तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी.

या बरोबरच *आयटा* केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांना विनंती करते की शिक्षकांना या अतिरिक्त कामातून मुक्त करावे. जेणेकरून ते आपल्या क्षेत्राची जबाबदारी योग्यरित्या प्रभावीपणे पार पाडू शकतील. कारण देशाचं भविष्य त्यांच्या हातात आहे.त्यांचं आरोग्य चांगलं असेल तरच देशात शिक्षण ही चांगलं. पर्यायाने भविष्यही उज्ज्वल होईल.