
व्हेंटिलेटर चालू न करण्यासाठी लोकप्रतिनिधीचे दबावतंत्र : साकिब शहा यांच्या पत्रकार परिषदेत आरोप
सत्ता की कुर्सी है तुम्हारा जनाजा तो नही। कुछ कर नही सकते तो उतर क्यों नही जाते।।
यवतमाळ / पुसद – कोरोना काळामध्ये रुग्णालयात व्हेंटिलेटर व डॉक्टरची उपलब्धी असताना ते सुरु न करण्यासाठी लोकप्रतिनिधीने रुग्णालय प्रशासनावर दबाव टाकल्याचा आरोप करीत लोकप्रतिनिधीने लोकांचे जीव वाचविण्यासाठी स्वतःच्या खिशातील पैसा खर्च नाही केला तरी चालेल पण आमदार निधीचा तरी करावा अशी रास्त अपेक्षा व्यक्त करीत
” सत्ता की कुर्सी है तुम्हारा जनाजा तो नही,
कुछ कर नही सकते तो, उतर क्यों नही जाते ?”
असा लोकप्रतिनिधींना आपल्या कर्तव्याची जाणीव शेर मार्फत साकिब शहा यांनी शासकीय विश्रामगृह पुसद येथे आज आयोजित पत्रकार परिषदेतून करुन दिली.
महाभयंकर अशा कोरोना संकटाने अनेकांवर प्राणांतिक संकट आले. आर्थिक, शारीरिक व मानसिक नुकसानीसह अनेक संकटाचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांना आरोग्य वर्तक सुविधा पुरविताना आरोग्य व पोलिस यंत्रणा जिवापाड मेहनत घेत असल्याचे चित्र आपण देशभर पाहताना अशामध्ये या कोणाच्या विरुद्ध लढाई करण्यासाठी सामान्य नागरिक ते मंत्री एक सामाजिक जबाबदारी म्हणून कर्तव्य पार पाडून या लढाईचा सैनिक बनण्याचा प्रयत्न करीत आहे तर दुसरीकडे प्रशासनातील शिपाई ते जिल्हाधिकारी त्यांच्यापर्यंत जो तो आपल्या नोकरी टिकवून ठेवण्यास सोबतच या धोरणाच्या युद्ध लढ्यात कोरोणाला हरविण्यासाठीचा आपला वाटा उचलत नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी झटत आहेत यात तिळमात्र शंका नाही, अशा कोरोना योद्ध्याला त्रिवार सलाम सलाम सलाम. परंतु याउलट कोरोना काळाच्या महाभयंकर परिस्थितीमध्ये अनेकांना व्हेंटिलेटर अभावी कोरोना रुग्णाला मरण यातना सहन करीत सरणावर जाण्याची वेळ आली तरीपण उपजिल्हा रुग्णालय पुसदमध्ये रुग्णाचा जिव वाचविण्यासाठी आवश्यक ते व्हेंटिलेटर सारखे जीवनदायिनी उपकरण -यंत्रसामग्री व त्यासाठी लागणारे डॉक्टर कर्मचारी उपलब्ध असताना त्याचा रुग्णाची जीव वाचवण्यासाठी उपयोग केला नाही.
ही बाब खेदजनक, निषेधार्ह आणि नागरिकांच्या जिवाशी खेळणारी आहे. असा स्पष्ट शब्दात उपजिल्हा रुग्णालय पुसद च्या प्रशासनाबद्दल पत्रकार परिषदे मधून सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक साकिब शाह यांनी रोष व्यक्त केला.
उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे 10 पेंटी लेटर असल्याची खळबळजनक माहिती मिळताच साकिब शहा यांनी रुग्णालय आठवण सत्यता पडताळून पाहिली तर एका ऑपरेशन थिएटर च्या खोलीमध्ये दहा वेंटीलेटर धूळ खात पडलेले आढळून आले याबाबत रुग्णालय प्रशासनाने सोबत चर्चा केली असता सदर व्हेंटिलेटर हे मागील आठ महिन्यापासून एमडी डॉक्टर नसल्याच्या कारणावरून पडून असल्याचे माहिती मिळाली परंतु रुग्णसेवेत नेहमीच तत्पर असणारे साकेत शहा यांना ही बाब पटली नाही तरीसुद्धा त्यांनी वैद्यकीय अधीक्षक पुसद यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ उपविभागीय अधिकारी पुसद आरोग्यमंत्री मुख्यमंत्री तथा पंतप्रधान यांच्यापर्यंत पत्रव्यवहार करून कोरूना काळामध्ये रुग्णाचे जीव वाचवण्यासाठी या व्हेंटिलेटर चा उपयोग करण्याची मागणी केली परंतु जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सदर व्हेंटिलेटर पुसदला चालू करण्याची यवतमाळ येथे नेण्याचे अयशस्वी प्रयत्न केले ते शक्य झाले नाही म्हणून व्हेंटिलेटर चालविण्यासाठी एमडी डॉक्टर आमच्याकडे उपलब्ध नसल्याचा भाऊ जिल्हा शल्य चिकित्सक यांनी परंतु सामाजिक कार्यकर्ते साकिबशहा यांनी सर्जिकल स्ट्राइक करीत उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले व सध्याच्या काळात उमरखेड येथे बदलीवर असलेली एमडी डॉक्टर किशोर राठोड यांच्यासह अनेस्थेशिया तज्ञ डॉ पुनम चव्हाण हे उपजिल्हा रुग्णालयात नोकरी असतांना ते खासगी दवाखान्यांमध्ये ड्युटी करत असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक तथा जिल्हा शल्यचिकित्सक यांना पुराव्यासह सादर करीत त्यांना व्हेंटिलेटर चालविण्यासाठी आदेशीत करण्याची मागणी साकिब शहा यांनी एका पत्राद्वारे केली. पितळ उघडे पडल्याने जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ यांनी ताबडतोब आदेश करीत उपजिल्हा रुग्णालय मध्ये डॉक्टरला उपस्थित राहण्याचे आदेश दिले. त्यानंतर डॉक्टर किशोर राठोड यांनी आदेशाचे पालन न करता नेहमीच्या वेळकाढू धोरणानुसार काही दिवसांनी उपजिल्हा रुग्णालयात प्रभार सांभाळला. त्यानंतर व्हेंटिलेटर आहे परंतु इन्स्टॉलेशन झाले नसल्याने ते चालू करता येत नसल्याचे कारण समोर करीत इंस्टॉलेशन साठी कासवगतीने इच्छा नसताना आरोग्य विभाग काम करत असल्याची बाब लक्षात आली आणि साकीब शाह यांनी सशाच्या गतीने इन्स्टॉलेशन करणाऱ्या नांदेड येथील तंत्रज्ञ इसमास विनंती वजा आव्हान तसेच दबावतंत्राचा वापर करीत त्यास पुसद येथे बोलावून घेतले एवढेच नव्हे तर दिवसभर रुग्णालयांमध्ये थांबून डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये इन्स्टॉलेशन सह सर्व दुरुस्ती करीत व्हेंटिलेटर चालू करून दिले. व्हेंटिलेटर सुरू केल्या बद्दल साकिब शहा यांचे राजकीय व सामाजिक नेते कार्यकर्ते यांच्यासोबतच नागरिकांनी सुद्धा सोशल मीडियासह शहरात चौका चौकात बॅनर लावून जाहीरपणे शुभेच्छा व नागरी सत्कार करून केलेल्या सत्कार याबद्दल अभिनंदन करून आम्ही आम्ही साकिब शहा च्या पाठीशी आहोत अशा भावना व्यक्त केल्या व या सत्कारात आपल्या जबाबदारीत वाढ झाली असल्याने या वेंटिलेटर कडे साकिब शहा यांनी नियमित लक्ष दिले. या सर्व जनसेवेच्या कार्यासाठी त्यांना अनेक अपमान, व सोसावे लागणारे त्रासाचे अनेक उदाहरणे त्यांनी पत्रकारांसमोर मांडले.
व्हेंटिलेटर चे इंस्टॉलेशन आवश्यक ते डॉक्टर उपलब्ध झाल्यानंतर रुग्णालय प्रशासन कामाला लागावे अशी अपेक्षा असताना पुन्हा जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ यांनी वेंटिलेटर चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात डॉक्टर, नर्सेस,कर्मचारी, शिपाई पूर्तता झाल्याशिवाय व्हेंटिलेटर चालू करता येणार नसल्याचा कांगावा रुग्णालय प्रशासनाने करीत असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये साकिब शहा यांनी दिली.
एक-दोन व्हेंटिलेटर सुरू करून ईतर व्हेंटिलेटर सुरू करण्यासाठी रुग्णालय प्रशासन वेगवेगळे कारण का सांगत आहे याचा शोध घेतला असता, लोकप्रतिनिधी ने जिल्हा शल्य चिकित्सक यांना पुसदचे व्हेंटिलेटर सुरू न करण्यासाठी तंबी दिली असल्याचा पुरावा मिळाला त्यावेळी साकिब शहा अवाक झाल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आणि शहा यांनी जाहीरपणे सांगितले की, ज्या लोकप्रतिनिधीला व्हेंटिलेटर सुरू केल्याचे क्रेडिट घ्यायचे असेल त्यांनी घ्यावे परंतु जनतेचे जीव वाचवणारी वेंटिलेटर यंत्रणा उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे त्वरित सुरू करावी अशी मागणी केली. तसेच कुबेर रुग्णाचे वाढते प्रमाण बघता पूर्णा पेशंट साठी आणखी 50 बेड सर्वस्वी ते 6 उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे वाढविण्यात यावे कोरोना सेंटर मधील बंद असलेले पंखे, लाइट,नळाच्या तोट्या दुरुस्त करून बसविण्यात यावे व पाण्याची उपलब्धता करून देण्यात यावी, उपजिल्हा रुग्णालयात बंद असलेले जलशुद्धीकरण यंत्र सुरू करावे. पाण्याची उपलब्धता करून देण्यात यावी. रुग्णालयाची एकही ॲम्बुलन्स नसल्याने सुसज्ज ॲम्बुलन्स उपलब्ध करून देण्यात यावी. उपजिल्हा रुग्णालयात मोबाईल एक्स-रे मशीन गेल्या अनेक महिन्यापासून बंद पडलेले आहे सदर मशीन चालू असली तर गरीब रुग्णांना सिटीस्कॅन साठी हजार रुपये खर्च करण्याची गरज पडणार नाही तसेच ब्लड स्टोरेज मशीन गेल्या अनेक महिन्यापासून धूळ खात पडली आहे परंतु रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी त्याचा उपयोग होत नाही, ही शोकांतिका आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर किशोर राठोड हे उमरखेड येथे तर डॉक्टर कैलास राठोड हे पुसद येथे आपल्या स्वतःचे खाजगी दवाखाने चालवितात तर डॉक्टर पूनम चव्हाण हे खाजगी दवाखाना मेडिकेअर हॉस्पिटल पुसद येथे कार्यरत आहेत त्यामुळे ” नोकरी शासनाची मात्र चाकरी खाजगी दवाखान्याची ” ” पगार शासनाचा, नोकरी खाजगी दवाखाण्यात अशी महाभयंकर परिस्थिती कोरोना काळातही चालू आहे. उपजिल्हा रुग्णालय प्रशासनासह जिल्हा शल्य चिकित्सक या सर्व हलगर्जीपणास जबाबदार असून त्यांचे हे कृत्य खाजगी दवाखान्याशी अर्थपूर्ण साठगाठ असल्यामुळेच हे होत असल्याचा स्पष्ट आरोप साकिब शहा यांनी पत्रकार परिषदेतून केला.










































