Home नांदेड राज्यातील प्रत्येक कोवीड सेंटरच्या बाहेर सिसीटिव्ही एलएडीद्वारे प्रक्षेपित करा – नारायण गायकवाड 

राज्यातील प्रत्येक कोवीड सेंटरच्या बाहेर सिसीटिव्ही एलएडीद्वारे प्रक्षेपित करा – नारायण गायकवाड 

116
नांदेड ता.०८ :- संपूर्ण महाराष्ट्रातील कोवीड सेंटरच्या बाहेर कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना आतील थेट प्रक्षेपण दिसाव या भुमिकेतून एलएडी द्वारे प्रत्येक कोवीड सेंटरच्या आतील सिसीटीव्हीचे थेट प्रक्षेपण एलएडी द्वारे प्रक्षेपित करुन रुग्णांची परिस्थिती पाहून बाहेरील रुग्णांचे नातेवाईक रुग्णांना मानसिक आधार देतील आणि तो कोरोना बाधीत रुग्ण लवकर बरा होईल तद्वतच कोरोनाच्या नावाखाली लाखो रुपयांचा होणारा गोँधळ संपुष्टात येईल
तसेच कोरोना बाधीत रुग्णांना मानसिक आधार द्यावा आणि यामुळे विनाकारण फिरणा-यांची संख्या कमी होईल अशी मागणी नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे ई निवेदना द्वारे केली आहे