
“नियम कागदावर , अधिकारी वा-यावर” –
महावितरणच गलथान कारभार चव्हाट्यावर
नांदेड – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर दि.०५ एप्रिल रोजी आदेश जारी केला त्यात त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांना दि” .३० एप्रिल पर्यत विज पुरवठा अखंडीतपणे सुरू ठेवण्याच्या सुचना दिल्या पण वातावरणीय बदलामुळे किमान तासभर विज पुरवठा खंडीत होणे ही सामान्य बाब असली तरीसुद्धा तासन् तास शहरातील छत्रपती चौक,जैन मंदिर,झेंडा चौक,तरोडा नाका आदी भागातील विजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने नागरिकांच्या नाकी नऊ येत आहे.
एकीकडे कोरोनामुळे बाहेर पडणे अशक्य असून दुसरीकडे उकाड्याने नागरिकांचे हाल होताना दिसत आहे
या कारणांमुळे परिसरातील नागरिकांतून नियम कागदावर अधिकारी वा-यावर अशी उलट सुलट चर्चा जोर धरत असून हा तिढा सुटणार का? असा सवालही नागरिकांना पडला आहे यातच खंडीत विज पुरवठ्यासाठी सुरु असलेला हेल्पलाईन क्रमांक 78757 58343
हा सतत व्यस्त असतो तर क्वचित प्रसंगी बंद सुद्धा असतो. इकडे आड अन् तिकडे विहिर अशा स्थितीत आमचा प्रश्न मांडायचा कुठं अशा संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना दिली.











































