Home नांदेड पत्नी हो तो ऐसी ????

पत्नी हो तो ऐसी ????

704

करोना मुळे पती चा मृत्यू झाला अन , विपरितच घडलं ,

दुःखद घटना

अमीन शाह

पतीचं करोनामुळे निधन झाल्याची माहिती मिळताच पत्नीने आपल्या तीन वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे . नांदेडच्या लोह शहरात ही घटना घडली आहे . महिलेने दोन्ही मुलींना घरी ठेवून तीन वर्षांच्या मुलासह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली . आई वडिलांविना मुली पोरक्या झाल्या आहेत .
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की , शंकर गदम ( 40 ) मूळ आंध्र प्रदेशातील होते . मजुरी करणारे शंकर गदाम हे लोहा शहरातील बालाजी मंदिराच्या पाठीमागे पत्नी दोन मुली व एक मुलासह राहत होते . शंकर गदम यांचा करोना अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर लोहा येथील रुग्णालयात उपचार सुरू होते , उपचारादरम्यान शंकर गदम यांचा मुत्यू झाला . ही घटना समजली असता त्यांच्या पत्नीला मोठा धक्का बसला .  मध्यरात्री लहान मुलाला सोबत घेऊन त्यांनी शहराजवळ असलेल्या सुनेगाव तलावात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली . या प्रकरणी लोहा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक करे हे करीत आहेत .