Home विदर्भ केंद्रीय कोवीड तपासणी पथक आर्वी शहरात दाखल

केंद्रीय कोवीड तपासणी पथक आर्वी शहरात दाखल

338

रवींद्र साखरे आर्वी

वर्धा  – आज दिनांक 11/04/2021 रोज रविवार ला सकाळी 11.00 वा केंद्रीय कोवीड तपासणी पथक आर्वी शहरात दाखल झालेले असून शहरात कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता उपजिल्हा रूग्णालय येथिल लसीकरण तसेच एन्टीजन तपासणी,RTPCR तपासणी त्याच प्रमाणे पांडूरंग वार्ड येथिल आसोले ले- आऊट येथे तयार करण्यांत आलेल्या कंटेनमेंट झोन ,बफर झोन तसेच शहरात कोरोना विषाणू बाबत केलेल्या उपाय योजना बाबत आढावा घेण्या करीता केंद्रीय पथकाद्वारे प्रत्यक्ष तपासणी करून आढावा घेण्यांत आला. त्याच प्रमाणे शहरातील नागरीकामध्ये मास्क लावणे बाबत जनजागृती करणे तसेच नियम मोडणा-या व्यावसाईकांवर तसेच नागरीकान वर कठोर दंडात्मक कार्यवाही करण्यांबाबत सूचित केले. सदरच्या पथकामध्ये केंद्र स्तरीय अधिकारी, जिल्हा स्तरीय अधिकारी, तसेच मा.उपविभागीय अधिकारी आर्वी, मा.तहसीलदार साहेब, आर्वी, मा. वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रूग्णालय आर्वी, मा. थानेदार साहेब, आर्वी, मा. तालुका आरोग्य अधिकारी आर्वी,मा. मुख्याधिकारी नगर परिषद आर्वी, मा. उपमुख्याधिकारी न.प. मा. अभियंता न. प. आर्वी तसेच नगर परिषदेतील नियुक्त संपूर्ण कोरोना पथकातिल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..