Home नांदेड सारखणी येथे मटका , अवैध दारू , जुगार,अवैध धंदे जोमात.

सारखणी येथे मटका , अवैध दारू , जुगार,अवैध धंदे जोमात.

362

मजहर शेख

नांदेड/किनवट, दि. २५ –  एकीकडे कोरोनामुळे प्रशासन लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे हातावर पोट असणारे छोटे -मोठे व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे .

तर एकीकडे सारखणी परिसरातील तरुण वर्ग मुबंई कल्याण मटका , अवैध दारू , जुगार या साख्या अवैध धंद्यामुळे देशोधडीला लागला आहे देश आधीच कोरोना व लॉकडाऊन मुळे पंधरा वर्ष मागे आला आहे त्यात तरुणांच्या हाताला काम नसल्यांने या अवैध धंद्याकडे वळत आहे व संसारात गुंतलेला माणुस या पाई लाचार व उध्वस्थ होत आहे .सिंदखेड पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच सारखनी येथे अवैध काम सुरू असून पोलिस प्रशासन का या गंभीर बाबीकडे लक्ष देने गरजेचे आहे या बाबत सुजाण नागरिक व समाज सेवकाकडून बोलल्या जात आहे.