Home विदर्भ यवतमाळ जिल्ह्यात 611 जण कोरोनामुक्त तर 6 मृत्युसह 471 जण पॉजिटिव्ह

यवतमाळ जिल्ह्यात 611 जण कोरोनामुक्त तर 6 मृत्युसह 471 जण पॉजिटिव्ह

1188

यवतमाळ , दि . 20 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन बॉर्ड , विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटर येथे भरती असलेल्या 611 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे . तर गत 24 तासात सहा कोरोनाबाधितांचा मृत्यु झाला असून 471 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत . जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 65 वर्षीय महिला आणि 42 वर्षीय पुरुष , दिग्रस शहरातील 85 वर्षीय पुरुष , दारव्हा येथील 65 वर्षीय पुरुष , पुसद तालुक्यातील 65 वर्षीय महिला आणि घाटंजी येथील 83 वर्षीय पुरुष आहे . शनिवारी पॉझेटिव्ह आलेल्या 471 जणांमध्ये 327 पुरुष आणि 144 महिला आहेत . यात यवतमाळातील 242 , दिग्रस 46 , उमरखेड 32 , दारव्हा 27 , पुसद 26 , बाभूळगाव 25 , आर्णी 23 , नेर 17 , पांढरकवडा 13 , रालेगाव 6 , घाटंजी 5 , वणी 5 , महागाव 1 आणि इतर ठिकानचे 3 रुग्ण आहे . शनिवारी एकूण 4771 रिपोर्ट प्राप्त झाले . यापैकी 471 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4300 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले . सद्यस्थितीत जिल्ह्यात 2098 क्टीव्ह पॉझेटिव्ह आहे . तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 24211 झाली आहे . 24 तासात 611 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 21567 आहे . तर जिल्ह्यात एकूण 546 मृत्युची नोंद आहे . सुरवातीपासून आतापर्यंत 226186 नमुने पाठविले असून यापैकी 215583 प्राप्त तर 10603 अप्राप्त आहेत . तसेच 191372 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे .