Home नांदेड सारखणी येथे मास्क न वापरणाऱ्या कडून दंड वसूल.

सारखणी येथे मास्क न वापरणाऱ्या कडून दंड वसूल.

706
0

मजहर शेख

नांदेड‌ – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासना कडून कडक पाऊले उचलली जात आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या आदेशानुसार दंडात्मक कारवाईची मोहीम सारखणी ग्राम पंचायत व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने कोरोना संसर्गाच्या प्रसार होऊ नये म्हणून सारखणी ग्राम पंचायत अंतर्गत सारखणी येथिल वसंतराव नाईक चोक तसेच किनवट रोड, मांडवी रोड वर गर्दीच्या ठिकाणी सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके, सरपंच वनमाला ताई तोडसाम,यांच्या समवेत पोलिस कर्मचारी पठाण,शेंडे ,ग्राम पंचायत चे कर्मचारी संजय वानखेडे, प्रकाश कांबळे, यांनी मास्क न वापरणाऱ्यां कडून 100 रुपये दंड वसूल केला आहे . यावेळी उपसरपंच अंकुश जाधव, हेही पथकासमवेत रस्त्यावर उतरुन सहभागी झाले होते.

मास्क नसणाऱ्याकडून 100 रुपये दंडही वसूल करण्यात आला.तसेच कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेतील कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे, साबणाने स्वच्छ हातधुणे व शारीरिक अंतर ठेवणे या त्रिसूत्रिचा वापर करावा, असा संदेशही यावेळी नागरिकांना दिला आहे.