
एका प्रसिद्ध चॅनलच्या मालकासह इतर 8 जणांच्या आंतरराज्यीय टोळीला अटक
43 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त ,
अमीन शाह
पुण्याच्या सायबर गुन्हे शाखेने सव्वा दोनशे कोटी रुपयांच्या सायबर दरोड्याचा कट उधळून लावला आहे . या प्रकरणात एका प्रसिद्ध चॅनलच्या मालकासह इतर 8 जणांच्या आंतरराज्यीय टोळीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत . सोबतच , या लोकांकडून पोलिसांनी 25 लाख रोख रुपये , 11 मोबाईल फोन , एक क्रेटा कार , एक डस्टर कार आणि एक स्कूटर असा एकूण जवळपास 43 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
या संदर्भात प्राप्त माहिती नुसार
पुण्यातील महर्षी नगर येथे असलेल्या ICICI आणि पुणे TT HDFC बँकेच्या डोरमंट अकाउंटचा ( व्यवहार बंद असलेले खाते ) डेटा पुण्यातील हॅकर्सच्या मदतीने चोरला जात होता . याची गुप्त माहिती पुणे सायबर गुन्हे शाखेच्या हाती लागली . यानंतर पोलिसांनी एक टीम तयार केली आणि महर्षी नगर येथे जाऊन सापळा रचला . या टीममध्ये पुणे सायबर सेलचे एक्सपर्ट सुद्धा होते . त्याचवेळी एका ऑरेंज रंगाच्या क्रेटा कारमधून एक व्यक्ती उतरली . त्यानंतर त्याच ठिकाणी 5 पुरुष आणि 1 महिला देखील आली . त्यांना पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतले . सविस्तर तपास केला असता त्यांच्याकडे 216 कोटी 29 लाख 34 हजार 240 रुपये एवढ्या रकमेच्या डॉरमंट अकाउंटची माहिती असल्याचे समोर आले . आरोपींमध्ये चॅनलच्या मालकाचेही नाव आरोपींपैकी एक रोहन रविंद्र मंकणी याने हा डेटा चोरून सिंहगड रोडला राहणाऱ्या सुधीर शांतीलाल भटेवरा उर्फ जैन याच्याकडे देणार होतो अशी कबुली दिली . यानंतर धागेदोरे लागले आणि मुंबईच्या रेल्वे स्टेशनवरूनही दोन जणांना अटक करण्यात आली . हे दोघे गुजरातचे होते . उल्लेखनीय बाब म्हणजे , आरोपींपैकी दोन जण औरंगाबादचे असून ते एका खासगी वृत्तवाहिनीचे मालक आणि संचालक आहेत असेही सूत्रांकडून समजते .











































