Home मराठवाडा महाशिवरात्री: परमपिता शिवपरमात्मांचा अवतरण दिवस

महाशिवरात्री: परमपिता शिवपरमात्मांचा अवतरण दिवस

518

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

सर्व प्रथम, भारतीय अनेक पर्वांपैकी,महापर्व महाशिवरात्रीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा….!

भारतीय संस्कृतीत अनेक सण, उत्सव साजरे केले जातात. काही सण हे देवी देवतांच्या जन्म दिवसा निमित्ताने साजरे केले जातात तर काही सण,उत्सव हे सामाजिक कारणांमुळे तर काही ऋतूंच्या आगमना पुर्वी किंवा शेवटी साजरे केले जातात, परंतु प्रत्येक सण, उत्सव साजरा करण्याच्या पाठीमागे नक्किच उद्देश असतो. खुशी साजरी करणे, भुतकाळातील कटु व दुःखी अनुभवांना विसरणे व आपआपसांमध्ये बंधूत्व भावना निर्माण करणे, प्रेमाने व्यवहार करणे परंतु ह्या सर्व उत्सवांमध्ये महाशिवरात्रीचा उत्सव हा भिन्न स्वरूपांमध्ये दिसतो . महाशिवरात्री ला सर्वात उच्च पर्व म्हटले तरी अतिशयोक्ती नाही म्हणता येणार, कारण परमपिता शिव परमात्मा यांचा अवतरण दिवस म्हणून महाशिवरात्रि उत्सव साजरा केला जातो. ईथे हा जो ‘रात्री’ शब्द प्रत्येक २४ घण्ट्यांमध्ये एक वेळेस येणारा अंधकारमय वेळेचा सुचक नाही,परंतु रात्री हा शब्द अलंकारिक रूपामध्ये प्रयोग होतो तर रात्री म्हणजेच अन्याय, अत्याचार ,लुट-मार, भ्रष्टाचार व मानवीय मुल्यांचे पतन याला लक्ष्यवेधीत करणारा आहे. सर्व कल्पांमध्ये अशी वेळ येते, जेव्हा मनुष्य धर्म भ्रष्ट होत जातो, तेंव्हा परमात्मा शिव सदा जागती ज्योत, सदा कल्याणकारी ह्या धरतीवर मानव मात्र च्या कल्याणार्थ सृष्टी वर अवतरीत होतात म्हणूनच तर ह्या रात्री ला महाशिवरात्री च्या नावाने आठवण करतात. एक म्हण म्हटली जाते की परिस्थिती ही पुरूषाला जन्म देत असते तर संसारातील परिस्थिती अत्यंत धर्म ग्लानी करणार्या दिसुन येतात तेंव्हा पुरुषोत्तम अवतरीत होत असतो. शिव भोलेनाथ चे कर्तव्य पण भारीच अर्थात परमोच्च आहे. मनुष्यआत्मा आणि परमात्मा शिव यांचं नात आहे़ पिता आणि मुलाच म्हणूनच तर आपण परमपिता शिव असेही म्हणतो.जेव्हा व्यक्ती परेशान होतो तेव्हा तो आपल्या लौकिक वडीलांची आठवण करतो परंतु जेंव्हा प्रकृती सहीत सर्व मनुष्यांवर संकट येते तेंव्हा त्या दुःख हर्ता परमात्म्याचा धावा केला जातो त्यामुळेच तर हर हर महादेव असे म्हणतात. परमात्मा शिव हे युगपुरुष नाहीत तर युगपरीवर्तक आहेत . अज्ञान निद्रेत जीवन जगत असलेल्या मनुष्याला ज्ञान देऊन त्यांचे कल्याण करतात म्हणूनच तर ते ज्ञान रत्नांचे ईश्वर रत्नेश्वर आहेत त्यांच्या स्मरणाने आपले पापकर्म नष्ट होतात तेंव्हाच ते पापकटेश्वर झाले,काम, क्रोध ,लोभ,मोह ह्या मानसिक आजारांपासून मुक्त करतात तेंव्हा तर कर्तव्य वाचक नाव आहे वैद्यनाथ व मुक्तेश्वर , शिवाचे प्रत्येक मंदिरात वेगवेगळ्या नावांनी स्मरण होणे हे त्यांच्या श्रेष्ठत्वा कडे घेऊन जाते. परमात्म्याच्या प्रत्येक नावापुढे नाथ किंवा ईश्वर हा शब्दप्रयोग त्यांची अॅथाॉरीटी सादर करतो जसे की, सोमनाथ ,वैद्यनाथ विश्वनाथ , ओंकारेश्वर, त्र्यंबकेश्वर, रामाने पुजन केले तेंव्हाच तर ते रामेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले तर कृष्णाच्या स्मरणाने गोपेश्वर झाले व त्यामुळे देवाधीदेव महादेव असे गायन केले. त्यांचे स्वरूप ज्योतीर्बिंदू आहे तेंव्हा आपण शिवाच्या पिंडीवर ज्योत किंवा बिंदू काढत असतो. शिवाच्या ज्योतीस्वरुपातुन तीन शक्ती निर्मित होऊन ब्रह्मा,विष्णु,शंकर उत्पन्न झाले व ते ब्रह्मा द्वारे दैवी मनुष्य सृष्टीची स्थापना, विष्णु द्वारे त्या सृष्टीची पालना तर शंकराद्वारे दु:खी व भ्रष्टाचारी दुनियेचा विनाश करण्यासाठी निमित्त बनतात, म्हणूनच तर तीन पानांचं बेलपत्र शिवाला अतिप्रिय आहे . शिवाच्या पिंडीवर तीन रेषा हे तीन कर्तव्यनिष्ट देवतांच प्रतिक आहे. शिवावरती धोतर्याच फूल का वाहतात ? जागरण का केले जाते ? पांढर फुल का प्रिय आहे?असे अनेक रहस्यं आहे त ते सर्व स्वतः परमात्मा शिव स्पष्ट करत आहेत नंदी मधून शिवाला का पाहिले जाते ? महाशिवरात्री हा खुप महान पर्व आहे त्याचे श्रेष्टत्व जाणले पाहिजे ,मानले पाहिजे, स्मरण केले पाहिजे , धारण केले पाहिजे, व त्याचे स्वरूप बनले पाहिजे . म्हटलं आहे ज्ञान सुर्य प्रगटा अज्ञान अंधेर विनाश . शिवा ची महीमा अगाध आहे जो कुणी त्यांच्या सान्निध्यात येतो तो श्रेष्टत्वाला प्राप्त होतो. परमात्मा मनुष्यालामनुष्यालादिव्य देवत्व पद प्राप्त करुन देण्याचे कार्य हे ब्रह्मा द्वारे करत आहेत. म्हणूनच शिवपुराण मध्ये म्हटले की ब्रह्माद्वारे सतयुगी सृष्टी रचनेच्या कार्यात तीव्रगती नव्हती तेंव्हा शिवाने परकाया प्रवेश केला व त्यांच्या मुखाद्वारे दैवी सृष्टी सृजन केले त्या ब्रह्मा ला अदिदेव म्हटले तर शिवाला स्वयंभु अथवा अदिनाश म्हटले आहे. शंकर द्वारे कलियुगातील आसुरी प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी सत्य ज्ञान सांगितले म्हटले जाते तिसरा नेत्र ऊघडताच विनाश होतो हा तिसरा डोळा हे ज्ञाना चे प्रतिक आहे. म्हणजेच कलियुगातील आसुरत्वाचा नाश तर सतयुगी दैवी सृष्टी चे सृजन होत आहे महाशिवरात्री निमित्त माझे स्मरण . जय शिव… भोलेनाथ. ओम् शांती!!!!

*ब्रह्माकुमारी दीपा बहेन*
*मोबाईल-९६२३२३२२६७*