Home विदर्भ कराओके राज्यस्तरीय स्पर्धेत डॉ. पडलवार यांची उत्तुंग भरारी

कराओके राज्यस्तरीय स्पर्धेत डॉ. पडलवार यांची उत्तुंग भरारी

286

सहपरिवार स्विकारला सत्कार


यवतमाळ / घाटंजी – तालुक्यातील पारवा येथिल सुप्रसिध्द डॉक्टर राजेश पडलवार हे रुग्णाची सेवा बजावित नुकत्याच पार पडलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारा आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय कराओके संगीत स्पर्धेत सहभागी होवून उत्तुंग भरारी घेत घाटंजी तालुक्याची मान उंचावली आहे.

आरोग्य सेवेसोबतच आपल्या अंगी असलेले सुप्त गुण जणते पर्यंत पोहचावे यासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर राजेश पडलवार पारवा परिसरात आरोग्य सेवा देण्यास प्रसिध्द आहे. ते रुग्णांना मनोभावे सेवा पुरवितात. अश्यातच नुकत्याच पार पडलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारा आयोजित स्पर्धेत सहभाग घेतला आणि ते पहिल्या १४ टॉपर मध्ये येवून मानांकन मिळविले. वैद्यकीय सेवा देत एक उत्तम गायक म्हणून एच बी14 मेडीसिन फार्मा तर्फे सत्कार समारंभ आयोजित करून डॉ. मयूर जवडेकर(अध्यक्ष) डॉ. योगेश लढे, डॉ. मयूर तिरमाखे सेक्रेटरी या मान्यवरांसह एच बी फार्मा 14 चे सर्वेसर्वा मेघदे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपस्थित पाहुण्याकडून पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.
डॉक्टर राजेश पडलवार हे आरोग्य सेवा देत कराओके राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेऊन पुरस्कार मिळविल्याने त्यांचे हे यश पाहून पारवा येथिल ज्येष्ठ कलावंत मोहम्मद रफी यांचे फैन संभाजी सुकले व त्यांचे चाहते यांनी त्यांचे कौतुक करीत अभिनंदन केले. रुग्ण सेवेसोबतच माझ्या अंगी असलेल्या सुप्त गुण जनतेपर्यंत पोहचवून त्यातून त्यांना आनंद देणे सुध्दा मी एक सेवाच समजतो असे त्यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलून दाखविले.