
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
एकाचच दुकानात काम करत असताना कामाच्या वाटणीवरून धुसफूस, कुरबुर करत नंतर त्याचे पर्यावसान खून करण्यात व्हावे हि अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समजली जात असून सदर घटनेमुळे जालना जिल्हा हादरून गेला आहे.

या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी येथील शहागड रोडवरील शिवतीर्थ मंगल कार्यालय ते पेट्रोल पंप दरम्यान रामहरि तुळशीराम सुरोसे रा.कृष्णनगर ,साडेगाव आणि संतोष बापुसिंग परदेशी रा.कडाआष्टी ता.जि.बीड या दोघांच्या मालकिची समर्थ बेकरी आहे.












































