Home विदर्भ बंजारा तिर्थक्षेत्र पोहरादेवी पवित्र भूमीला जोडणाऱ्या चार मुख्य रस्त्यांच्या कामांना दिली मंजुरी...

बंजारा तिर्थक्षेत्र पोहरादेवी पवित्र भूमीला जोडणाऱ्या चार मुख्य रस्त्यांच्या कामांना दिली मंजुरी , सार्वजनिक बांधकाम मंत्री – मा.ना.अशोकराव चव्हाण

399

मुंबई –  देशात व विदेशात राहणार्या बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी संस्थान या पवित्र भूमिला जोडणाऱ्या चार मुख्य रस्त्यांच्या दुरुस्ती व रुंदीकरणाच्या कामांना आज सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)मां.ना. श्री.अशोकराव चव्हाण साहेब यांनी ही मंजुरी दिली आहे.

मा.ना.श्री.चव्हाण साहेब बांधकाम मंत्री यांच्या अध्यक्षते खाली मुंबईत येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) उल्हास देबडवार, उपसचिव बस्वराज पांढरे, या कामाच्या मंजुरीसाठी सतत पाठपुरावा करणारे पोहरादेवी संस्थानचे महंत श्री. बलदेवजी महाराज यांच्येसह वाशिम जिल्हयाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
पोहरादेवी ते सिंगद रस्त्याचे दोन पदरी रुंदीकरण, पोहरादेवी ते सावळी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण, पोहरादेवी ते धानोरा रस्त्याची दुरुस्ती आणि नगाराभवन ते वसंतनगर (पोहरादेवी) रस्त्याच्या दोन्ही बाजूस नाली बांधकाम या कामांना यावेळी मंजुरी देण्यात आली आहे.
पोहरादेवी संस्थानचे महंत श्री.बलदेव राठोड महाराज यांनी पोहरादेवी संस्थान व उमरीगड या तिर्थक्षेत्राला जोडणाऱ्या चारही रस्त्यांच्या रुंदीकरण, खडीकरण व दुरुस्तीची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.श्री.चव्हाण साहेब यांच्याकडे केली होती. अनेक वेळा मुंबई येथे जावून पाठपुरावा केले, त्यांच्या मागणीची दखल घेत बांधकाम मंत्री महोदयांनी आजच्या बैठकीत या कामांना मंजुरी दिली आहे..