Home विदर्भ अमरावती जिल्ह्यात सात दिवसाचा लॉकडाउन जाहीर

अमरावती जिल्ह्यात सात दिवसाचा लॉकडाउन जाहीर

310

मनिष.गुडधे

अमरावती जिल्यात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला असून हि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आता लॉक डाउन शिवाय पर्याय नसल्याने जिल्हा प्रशासनाने विकेंड लॉक डाउन ची चाचपणी केली,

मात्र अमरावतीचा ६० टक्कें भाग कोरोना बाधित झाल्याने आता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अमरावतीत जिल्ह्यात सात दिवसाचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आगामी २८ फेब्रुवारी पर्यंत संचारबंदी व जनता करफू राहणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणी चे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी याबाबत दिशानिर्देश जारी करीत नवी अधिसूचना सुद्धा जाहीर केली आहे. याबाबत विभागाचा आदेश यापूर्वी निघाला आहे ,मात्र जिल्हानिहाय परिस्थिती पाहून त्या त्या जिल्ह्याचे स्वतंत्र निर्णय होतील, त्याप्रमाणे अमरावतीची स्थिती पाहून स्वतंत्र निर्णय घेण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी लॉकडाउन शिवाय पर्याय नसल्याने अखेर सात दिवसाचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे अमरावती व अचलपूर शहरात सोमवारी सायंकाळपासून जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व बंद आस्थापना व प्रतिष्ठाने बंद राहणार आहे. तसेच इतर सर्व दुकाने बंद राहणार मात्र उद्योग सुरू राहणार आहे. संचारबंदी काळात बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांवये कारवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, स्वच्छता, मास्क व त्रिसूत्रीचा अवलंब करावा असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणीने केले आहे.