Home उत्तर महाराष्ट्र शिवकार्य गडकोटच्या मोहिमेत रामशेजवरील बुजलेल्या दोन सैनिकी जोत्यांना जीवदान.

शिवकार्य गडकोटच्या मोहिमेत रामशेजवरील बुजलेल्या दोन सैनिकी जोत्यांना जीवदान.

322

नाशिक – शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या १२३ व्या दुर्गसंवर्धन श्रमदान मोहिमेत अजिक्य दुर्ग रामशेजवर झाली,यावेळी माथ्यावरील मातीत बुजलेल्या,काटेरी झुडपात दडलेल्या सैनिकांच्या दोन जोत्यांचे दिवसभरातील श्रमदानातून त्यांच्या पाऊलखुणा नष्ट होण्यापासून वाचवण्याचे व त्यांना उजेडात आणण्याचे कामकाज दोन टप्प्यात झालेल्या अभ्यासपूर्ण श्रमदानातून  (दि.१४फेब्रु २०२१ ) रोजी करण्यात आले.यावेळी रामशेजवर वाढलेले प्लास्टिक व किल्ल्याची असुरक्षितता,दरवर्षी प्रमाणे यावेळी ही किल्ल्याला लागलेला वणवा,टवाळ,व कपल्सचे वाढते चाळे,किल्ल्याच्या पोटाला खोदाईमूळ दुर्ग रामशेजच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाल्याची भावना दुर्गसंवर्धकानीं किल्ल्यावरील बैठकीत व्यक्त केली.पर्यटन पोलिस,रामशेज वनविभाग व स्थानिक आशेवाडी गावाने याकामी अधिक लक्ष घालावे अशी भावना ही यावेळी दुर्गसंवर्धकानीं यावेळी व्यक्त केली.
शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था गेल्या ११ वर्षे नाशिक जिल्ह्यातील गडकिल्तांचे संवर्धनासाठी राबत आहे,दुर्ग रामशेजवर अखंड दुर्गमोहिमेच्या निमित्ताने झालेल्या दुर्गमोहिमेत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या दिवसभर चालेलेल्या श्रमदानातून भवानी मंदिरासमोरील व उत्तरेकडील दोन सैनिकी जोत्यांचे अस्ताव्यस्त दगड,चिरे गोळा केली,एकत्रित रचली,व जोत्यातील मोठे काटेरी झुडपे व गवत काढून जोत्यांच्या ऐतिहासिक पाऊलखुणा पुन्हा दुर्गप्रेमी,पर्यटकांना बघायला अभ्यासायला,बघायला मिळतील.यासाठी दिवसभर श्रमदान करण्यात आले. दरम्यान दुपारच्या सत्रात छोटी बालसंवर्धक स्वरा पिंगळे व शाहू पिंगळे याना संस्थेचे प्रमाणपत्र सन्मानपूर्वक देण्यात आले,तर दुर्गसंवर्धक प्रसाद भामरे,आशिष प्रजापती या दोघांना मोहिमेचा प्रचार-प्रसार कमिटीची जबाबदारी देण्यात आली.
किल्ल्यावर मोहीम सांगतेला गारद,शिवरायांची स्वा सावरकर यांची आरती,व दुर्गगीत गाऊन मोहिमेचा समारोप झाला,येत्या २८ फेब्रुवारी २०२१ (रविवार) रोजी १२४ वी किल्ले पिसोळगड मोहीम होईल असे नियोजन करण्यात आले.दिवसभर चाललेल्या या मोहिमेत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ,पर्यावरण समितीचे सागर शेलार,तुषार पिंगळे,श्रमदान समितीचे भूषण औटे,अमोल बच्छाव,रोहित गटकळ,जेष्ठ दुर्गसंवर्धक भाऊसाहेब चव्हाणके,पंकज ठाकरे,प्रचार-प्रसार कमिटीचे आशिष प्रजापती,प्रसाद भामरे,नवनाथ कालेकर,बाल दुर्गसंवर्धक शाहू पिंगळे,स्वरा पिंगळे सहभागी झाले होते.

चौकट:दुर्ग
राम खुर्दळ (संस्थापक-शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था नाशिक) रामशेज,हतगड,हरिहर,साल्हेर येथे शनिवार रविवार गर्दी असते,याठिकाणी वन विभागाचे सततचे दुर्लक्ष आहे,टवाळ मद्यपी कपल्स याठिकाणी मोठ्या प्रमानात येतात,दुर्गांची हेळसांड होते,इथल्या वस्तू चोरीस हातात,खोदकाम होतात,चोरी,दारू पिऊन धिंगाने होतात,किल्ल्याना आगी वणवे लावले जाते,मात्र मागणी करूनही प्रशासन येथे संरक्षण देत नाही,सुरक्षित पर्यटन नाही,रामशेजला वणवा लावून इथल्या जैवविविधतेचे मोठे नुकसान होत आहे,दुर्गांसाठी निधी येतो जातो कुठं?साधी येणाऱ्या जाणाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी कक्ष नाही,हे दुर्दैव आहे,रामशेजवर दक्षिण भागातील टाके,झेंड्याचे वरील टोक,व झाडांवर,मध्य माथ्यावर,झाडांवर, गांधी माश्यांचे,मोहोळ याच्या पासून दूर राहा यापूर्वी खूप जणांना यामुळं धोका निर्माण झाला होता,येणाऱ्यांची काळजी घ्यावी असे आवाहन आम्ही करीत आहोत,सुरक्षित पर्यटन करा दुर्ग बघा,