Home विदर्भ बासलापुर येथे १५ कावळे झाडावरून खाली पडले

बासलापुर येथे १५ कावळे झाडावरून खाली पडले

218

हनुमंत मेश्राम

अमरावती /  चांदुर (रेल्वे) – नजिकच बासलापुर येथे कावळ्यावर अध्न्यात रोगाने थैमान घातले असुन रविवारी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान जवळपास १५ कावळे झाडावरुन खाली पडले व त्यापैकी ३ कावळ्यांची मृत्यु झाल्याची माहीती गावकर्यानी दिली.
राज्य बात ‘बर्ड फ्लू’ या आजाराची भिती आहे. परंतु या रोगाचा अमरावती जिल्ह्यात शिरकाव झालेला नाही. असे दिसले तरी पक्शि रोगाने दगावत आहे. बासलापुरातील बुद्ध विहाराजवळ ४ कावळे व गावातील पुलाजवळ ११ कावळे खाली रस्त्यावर पडलेले रविवारी सकाळी गावकर्यांना दिसले.यांना उडता सुद्धा येत नव्हते. व यामधील ३ कावळ्याचा मृत्यु झाला.
यावेळी त्यांना पाणी सुद्धा पाजले.परंतु खाली पडलेले काही कावळे सुद्धा दगावण्याची शक्यता दिसत होती. गावकर्यांनी सदर माहीती तलाठी व पशु वैद्यकीय विभागाला दिली.
उर्वरीत कावळ्यांना उपचाराकरीता संबंधित विभागाची चमु घेऊन गेली होती.