Home जळगाव वरणगाव येथील हरवलेल्या व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह बोरघाटात*!

वरणगाव येथील हरवलेल्या व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह बोरघाटात*!

194

*वरणगाव येथील हरवलेल्या व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह बोरघाटात*! खुनाचा गुन्हा दाखल, एक जण ताब्यात.
रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील हरविलेल्या व्यक्तीचा मृतदेह पालघाटातील बोरघाटात संशयास्पद आढळून आल्याने घटनास्थळी सावदा पोलीसांनी धाव घेतली .

या बाबत अधिक माहिती अशी की ,चांगो रामदास झोपे (वय-६९) रा. झोपेवाडा वरणगाव ता. भुसावळ हे आपल्या मुलगा राकेश झोपे व सुनसह राहतात. मुलगा व सुन हे बाहेरगावी असताना चांगो झोपे यांच्याशी मुलगा राकेश यांचे शेवटचे बोलणे २९ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता झाले होते. मुलगा राकेश गावाहून घरी परत आल्याने घराला कुलूप लावले दिसून आले. वडील चांगो झोपे यांची नातेवाईकांकडे शोधाशोध सुरू केली. ते मिळून आले नाही म्हणून वरणगाव पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. तसेच राकेश झोपे यांनी त्याचे वडीलाची माहिती देणाऱ्यास रु,५१००० /- चे बक्षीस ठेवण्यात आले होते. आजच सकाळी खिरोदा येथून जवळ असलेल्या पालघाटातील बोरघाटात हरविलेले चांगो झोपे यांचा मृतदेह संशयास्पद आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच सावदा पोलीस ठाण्याचे एपीआय इंगोले व पोलीस कर्मचाऱ्यानी घटनास्थळी धाव घेतली असून,जे पंचनाम्याचे काम करत गुन्हा दाखल केलाय. मयताचे रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. यासंदर्भात एका जणाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास करीत एपीआय इंगोले व पोलीस कर्मचाऱी करीत आहेत. दरम्यान घटनास्थळी माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे अँडिशनल एस पी चंद्रकांत गवळी. डिवायएसपी मुक्ताईनगर तसेच सावदा निंभोरा पो. स्टे चे पोलीस निरीक्षक आदिंनी भेट दिली आहे.