Home विदर्भ आर्णी तालुक्यातील माळेगांव येथील जिव्हाळा कला संचचे सुनील चव्हाण यांचा पुसद येथे...

आर्णी तालुक्यातील माळेगांव येथील जिव्हाळा कला संचचे सुनील चव्हाण यांचा पुसद येथे भव्य सत्कार..!

242

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी / यवतमाळ – आर्णी तालुक्यातील माळेगांव येथील जिव्हाळा कला संचचे सुनिल चव्हाण यांचा पुसद येथे सन्मान पत्र देउन सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय सैनिक संस्था व ऑल इंडिया कलामंच च्या वतीने रविवारी पुसद (जि.यवतमाळ) येथे मेजर व्ही. आर. जाधव यांच्या श्रद्धांजली निमित्त, विर पत्नी व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष पंजाबराव मुधाने (मुंबई) हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून मेजर राजू जाधव, भगवान भितकर, सिने कलावंत मास्टर अतुल आदीं उपस्थित होते.
या वेळी मुंबई येथील पंजाबराव मुधाने यांच्या हस्ते वीरपत्नी एकता रमेश धुळधुळे, गीता रामदास जोगदंड, नगरसेवक शाकीब शहा, अमजत खान, जिव्हाळा कला संचचे सुनील चव्हाण यांचा शाळ, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजक रवी खिल्लारे हे होते, तर कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन चरण पवार यांनी केले. राष्ट्रीय सैनिक संस्थेचे श्री. पंकज, श्री. असाटी, राजू चिरडे, श्री. फारूक सर, विवेक मन्नरवार, शिवशंकर नागरे, सौ. सुनिता वितकर, सौ. कोमल तायडे या सह ईतर मान्यवर उपस्थित होते.
या पुर्वी सुध्दा जिव्हाळा कला संचचे सुनिल चव्हाण (माळेगांव ता. आर्णी) यांना राज्यस्तरीय पुरस्कारासह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे, हे विशेष.