Home विदर्भ तळेगांव नजीकच्या निरंकार कोटेक्स जवळील अपघातात एकाचा मृत्यु

तळेगांव नजीकच्या निरंकार कोटेक्स जवळील अपघातात एकाचा मृत्यु

370

रविन्द्र साखरे वर्धा

वर्धा / तळेगांव शा पंत : नजीकच्या निरंकार कोटेक्स नजीकच्या पुढील भागात असलेल्या मैदानात झालेल्या अपघातात एका गुराख्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शामराव कोटजावरे वय 72 वर्ष असे मृतक गुराख्याचे नाव आहे. आज सायंकाळ च्या सुमारास जनावरे घरी घेऊन जाण्याच्या तयारीत असलेल्या गुरख्यावर काळाने अचानक झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
निरंकार कोटेक्स च्या पुढील दर्शनी भागात जिनिंग मधले असंख्य वाहने उभी राहत असतात.आणी याच भागात खुले मैदान असल्याने परिसरातील गुराखे आपली जनावरे घरी नेण्याआगोदार याच परिसरात एकत्र करत असतात हे करत असताना अज्ञात वाहनाने या वृद्धाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघात स्थळी मृतदेह चेंदामेंदा झाला होता. कोणीतरी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिल्याने घटनास्थळी तळेगांव पोलीस तातडीने दाखल झाले होते.घटनास्थळी आमदार दादारावं केचे सुद्धा दाखल झाले होते, त्यांनी तातडीने आरोपी वाहनावर कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी पोलिसांना दिले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक आशीष गजभिये, पोलीस हवालदार संदीप महाकाळकर, मनोज आसोले, अमोल इंगोले,आशीष नेवारे यांनी धाव घेत सर्व परिस्थिती हाताळली.