Home विदर्भ सातरगावात जन समस्या घेऊन प्रदीप बोरकर(सामाजिक कार्यकर्ता) यांचे बेमुदत उपोषण

सातरगावात जन समस्या घेऊन प्रदीप बोरकर(सामाजिक कार्यकर्ता) यांचे बेमुदत उपोषण

368

प्रतिनिधी निखिल वाहणे

अमरावती –  नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सावरगावातील प्रदीप बोरकर यांनी 26 जानेवारीपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. संपूर्ण गावातून त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.
त्यांच्या मागणीनुसार पुर्व माध्यमिक शाळेत पहिली ते सातवी वर्ग खोल्यांचे बांधकाम पूर्ण करूणे, सातरगाव ते नांदगाव रस्त्याचे डांबरीकरण व पुलाचे बांधकाम करणे,सातरगाव ते दिघी कोल्हे रस्त्याचे डांबरीकरण व पुलाचे बांधकाम करणे, सातरगाव ते एरंडगाव रस्त्याचे डांबरीकरण व पुलाचे बांधकाम करणे, सातरगाव ते मोखड रस्त्याचे डांबरीकरण व पुलाचे बांधकाम करणे,सातरगाव ते सावनेर रस्त्याच्या दोन पुलांची दुरुस्ती करणे,सातरगाव येथील सर्व शेतशिवारातील पांदन रस्ते पुर्ण करणे, येथे ग्रामपंचायत भवन निर्माण करणे, येथील गोवारी, ओबीसी, मागासवर्गीय समाजातील गरीब कुटुंबाला घरकुलाचा लाभ देण्यात यावा.या सर्व मागण्या घेऊन प्रदीप वासुदेवराव बोरकर उपोषणाला बसले आहेत.