
लियाकत शाह
जळगाव जिल्यातील तब्बल १० महिन्यानंतर बुधवारपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले शासन नियमानुसार झाले आहेत. शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यां वर्गा मध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. तसेच शाळेत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची थर्मल गन ने तपासणी करण्यात आली. वर्गातही फिजिकल डिस्टन्सिंगचा अवलंब करण्यात आला होता. पहिल्या दिवशी जिल्ह्यात ८२ हजार ९६६ विद्यार्थी हजर होते, अशी माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली. डिसेंबरमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरू झाल्यानंतर राज्य शासनाने दुसऱ्या टप्यात २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार शिक्षण विभागाने गेल्या आठ दिवसांपासून शाळा सुरू करण्याची तयारी सुरू केलेली होती. जिल्यातील प्रत्येक शाळेत कोरोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचा आहेत. शाळेत प्रतेक आलेल्या विद्यार्थ्याची थर्मलगनच्या साह्याने प्रत्येक शाळेत तपासणी करण्यात आली. वर्गात एका बाकावर एकच विद्यार्थ्याला बसविण्यात आले होते. शासनाने पाचवी ते आठवी वर्ग बुधवारपासून सुरू केल्यामुळे शाळांमध्ये पूर्वीप्रमाणेच विद्यार्थ्यांची किलबिलाटत नवचैतन्य दिसत आले. बुधवारपासून बोदवड मध्येही पाचवी ते आठवी वर्ग सुरू करण्यात आला. शाळा सुरू होताच पाचवी ते सातवी पर्यंत जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळातील विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. कोरोना नियम पूर्णपणे शाळेद्वारे पाळले गेले. शाळेचे शिक्षक आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ बोदवडचे सरचिटणीस मजहर मुख्तार शाह यांनी सर्व मुलींचे हात सेनिटाइज़ केले तसेच शाळेचे समन्वयक सादिक अहमद यांनी विद्यार्थ्यांच्या थर्मल गनच्या सहाय्याने तपास केला. मीटर ने जैनुल अबेदीनने शरीराचे तापमान मोजले. मुख्याध्यापक इकबाल फैयूझोद्दीन यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि सर्वांना शासनाने पुरविलेल्या कोरोना नियमांचे पूर्ण पालन करण्याचे निर्देश दिले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.











































