Home मराठवाडा मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे एक दिवशीय संजिवन समाधी ध्यान योग शिबीराचे आयोजन

मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे एक दिवशीय संजिवन समाधी ध्यान योग शिबीराचे आयोजन

467

सोशल ङिस्टन्स ठेऊन एक दिवशीय ध्यान साधना शिबीराचा लाभ घ्या : आचार्य दिपक पगारे / स्वामी निरंजन

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे योगीराज कैलासनाथ महाराज यांनी स्थापीत केलेल्या संजिवनी समाधी ध्यान योग ज्ञान पिठात एक दिवशीय ध्यान साधना शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे ,अशी माहिती आयोजक दिपक पगारे गुरुजी व संयोजक स्वामी निरंजन महाराज यांनी दिली आहे .

सविस्तर असे की जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे योगीराज कैलासनाथ महाराज यांनी स्थापन केलेल्या संजीवनी समाधी ध्यानयोग ज्ञान पिठात एक दिवशीय ध्यान साधना शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोणा महामारीच्या धोकादायक परिस्थितीमुळे शासनाने लाॅकडाऊन जाहीर केले होते.त्यामुळे सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली होती.लाॅकडाऊन उठवल्यानंतर परिस्थिती पुर्व पदावर येत असताना शासनाच्या नियमांचे पालन करत तब्बल आठ- नऊ महीण्यानंतर ध्यानयोग शिबीराचा हा पहीलाच प्रयोग आहे.एकदिवसीय ध्यान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे दि 31 / 1 / 2021 रविवार रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत मोफत ध्यान साधना शिबीरात सर्वानी लाभ घेण्यासाठी नाव नोंदनी करावी असे आवाहन आयोजक दिपक पगारे गुरुजी व संयोजक स्वामी निरंजन महाराज यांनी केले आहे . नाव नोंदणी साठी 8888773020 / 7798663020 या नंबर संपर्क करावा असे ही आवाहन करण्यात आले आहे.