Home विदर्भ मतदानावर बहिष्कार करूनही खैरी पुनर्वसनाकडे दुर्लक्षच

मतदानावर बहिष्कार करूनही खैरी पुनर्वसनाकडे दुर्लक्षच

99
0

प्रजासत्ताकदिनी ग्रामस्थांचे अन्नत्याग…!

शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांची आंदोलनाला भेट…!

ईकबाल शेख

वर्धा – कारंजा घाडगे तालुक्यातील खैरी पुनर्वसन येथील ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी अन्न त्याग आंदोलन केले. मागिल विस वर्षांपासुन गावाला ग्राम पंचायतचा दर्जा नसल्याने गावतील ६९८ नागरीकांचे हाल होत आहेत. यावरुन ग्रामस्थांनी १५ जानेवारीला झालेल्या जऊरवाडा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीवर बहिष्कार केला परिणामी याठीकानी शून्य मतदान झाले व निकालानंतर सदस्याची एक जागा रिक्त राहिली. निवडणुक बहिष्कारवेळी कारनदी प्रकल्पग्रस्त समितीने तहसिलदार सचिन कुमावत यांना निवेदन दिले होते व २६ जानेवारी पुर्वी निवेदनातील मागण्यांबाबत दखल न घेतल्यास प्रजासत्ताक दिनी येथील नागरिक अन्न त्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. या नंतरही कुठलीच दखल घेतली नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी लक्षवेधक अन्नत्याग आंदोलन केले. या आंदोलनास शेतकरी आरक्षणाचे प्रनेते शैलेश अग्रवाल यांनी भेट दिली. 

शैलेश अग्रवाल यांनी मागील सरकारात तत्कालीन ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भूसे यांच्याकडे हा विषय मांडून निकाली काढला होता परंतु प्रशासनिक दिरंगाईने अद्यापही अंमलबजावनी झाली नसल्याचे यावेळी एकनाथ डोबले, संजय पाठे व ग्रामस्थांनी सांगितले. याविषयी संबंधित प्रशासकीय अधिकार्यांनी तातडीने पाठपुरावा करून विषय मार्गी लावण्याची गरज असल्याचे मत शैलेश अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केले.

खैरी हे गाव कार नदि प्रकल्पाचे बुडित क्षेत्रात असल्यामुळे सन २००० मध्ये कारंजा येथे खैरी गावाचे स्थलांतर केले. त्याला विस वर्षे झाली असुन शासनाने १८ नागरी सुविधा पुर्ण केल्या नाही. या विषयी अनेक वेळा निवेदन, आदोलन, मोर्चे काढुन कार्यालयाला कुलुप लावने, आत्मदहन व बहिष्कार सारखे प्रयोग करून वारंवार निवेदन देउन शासनाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले परंतु काहीच उपयोग झाला नाही व अद्याप ग्रामपंचायतचा दर्जा सुद्धा मिळाला नाही यामुळेच याठिकाणी प्रचंड नाराजीचे वातावरण आहे.