Home महत्वाची बातमी तब्बल अठरा वर्षा नंतर ती पाकिस्तान मधून आपल्या घरी परतली ,

तब्बल अठरा वर्षा नंतर ती पाकिस्तान मधून आपल्या घरी परतली ,

515

 

 

औरंगाबाद येथील महिलेची घर वापसी

अमीन शाह

औरंगाबाद : 65 वर्षीय हसीना बेगम 18 वर्षांपूर्वी आपल्या पतीच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी पाकिस्तानला गेल्या होत्या. एवढ्या वर्षांनी त्या आता भारतात परतल्या आहेत. पाकिस्तानात नातेवाइकांना भेटायला गेल्यानंतर त्यांचा पासपोर्ट हरवला, आणि येथूनच त्यांच्या संकटांना प्रारंभ झाला. पासपोर्टशिवाय त्यांना भारतात परतता येत नव्हतं. हसीना बेगम यांच्याकडे पासपोर्ट नसल्याने पाक पोलिसांनी त्यांना कैद केलं. तब्बल 18 वर्षे त्यांना पाकिस्तानच्या कैदेत राहावं लागलं. औरंगाबाद पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेत हसीना बेगम यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच काल मंगळवारी (26 जानेवारी) त्या भारतात परतल्या आहेत.

हसीना बेगम कोण ??

हसीना बेगम ह्या औरंगाबाद येथील रशीद पुरा भागातील रहिवाशी असून सिटी चौक परिसरात त्यांच्या नावावर एक घर सुदधा आहे , त्यांचा विवाह उत्तर प्रदेश मधील सरहानपूर येथील एका सोबत झाला होता ,

मायदेशी परतल्याचा स्वर्गीय आनंद – हसीना बेगम

मायदेशी परतल्यानंतर त्यांचे नातेवाईक आणि औरंगाबाद पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी त्यांचं रेल्वे स्थानकावर स्वागत केलं. “मी अनेक अडचणींचा सामना केला आणि आता मायदेशी परतल्यानंतर मला स्वर्गीय आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, मला पाकिस्तानमध्ये जबरदस्तीने कैद करण्यात आले होते. या प्रकरणात अहवाल सादर करणाऱ्या औरंगाबाद पोलिसांचे मी आभार मानते, अशी प्रतिक्रिया त्यांनी मायदेशी परतल्यावर दिली. हसीना बेगम यांना भारतात परत आणण्यासाठी मदत करणाऱ्या औरंगाबाद पोलिसांचे हसीना बेगम यांचे नातेवाईक ख्वाजा जैनुद्दीन चिश्ती यांनी आभार मानले.

पोलिसांचे आभार ,

हसीना बेगम यांच्या नातेवाईकांनि औरंगाबाद पोलिसांचे आभार वयकत केले आहे ,