Home विदर्भ देवघरातील दिव्यामुळे घराला लागली आग…!

देवघरातील दिव्यामुळे घराला लागली आग…!

154
0

ईकबाल शेख

वर्धा – तळेगांव (शा.पं.) :- दिनांक 26 जानेवारी ला तळेगांव (शा.पं.), काकडदरा वार्ड क्र. 6 मधिल रहिवासी धनराज शेंडे यांच्या घराला दुपारच्या दोन वाजताच्या सुमारास घरातील देवघरातील दिव्यामुळे आग लागली यामध्ये अंदाजे एक लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे.

सविस्तर वृत असे की धनराज शेंडे व त्याच्या पत्नि हे मोलमजुरी करनारे दाम्पत्य असुन रोजच्या दिनचर्येनुसार घरातील सर्व कामधंदा देवपुजा आटोपुन साधना व धनराज आपल्या रोज मजुरी करीता निघून गेले. दुपारी दोन वाजताचे सुमारास त्यांच्या घराला आग लागल्याचे शेजार्‍यांचे निदर्शनात आले लागलीच घराचे आजुबाजुच्या लोकांनी आग आटोक्यात आणुन पुर्णपणे विझविण्यात यश मिळविले. देवघारातील दिवा उंदिर किंवा मांजराने पाडला असावा त्यामुळेच हि आग लागली असावी असा अंदाज साधना शेंडे यांनी वर्तविला आहे या आगीमध्ये घरातील कपडे लत्ते, टि. व्हि., पंखा स्टुल, टेबल, बॅग मधील पाच हजार रुपये व १२ ग्रामची सोन्याची पोत व रेशन कार्ड असा एक लाखाचा ऐवज जळुन खाक झाला. सदर घटनेचा पंचनामा तलाठी किसन काैरती यांनी केला आहे. आगीत झालेल्या नुकसानामुळे शासनाकडुन आर्थिक मदत मिळावी अशी विनंती धनराज शेंडे व साधना शेंडे करीत आहे.