Home मराठवाडा पत्रकारिता हे समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे – पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड

पत्रकारिता हे समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे – पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड

811

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी

जालना – पोलिस आणि पत्रकार हे समाजसेवकच आहेत.पोलिस आणि पत्रकारांच्या भुमिकेमुळे समाजातील अनिष्ट प्रवृत्तीला अंकुश ठेवला जातो.पोलिस हे अधिकाराने काम करतात त्यांचे ते कर्तव्यच आहे, परंतु पत्रकार हे आपले काम सांभाळून समाजसुधारण्याच्या माध्यमातून कार्यरत असतात.

पोलिस पगारी असतात त्यांचे लोकसेवेचे काम कर्तव्यच आहे परंतु निरपेक्ष भावनेने मोठी रिस्क घेऊन पत्रकारिता करणे मोठे कसोटीचे समजले पाहिजे, असे प्रतिपादन घनसावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी केले.जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील पोलिस दुरक्षेत्र विभागीय कार्यालयात दर्पण दिनानिमित्त पोलिसांनी पत्रकारांचा सत्कार केला.पोलिस आणि पत्रकार हे मित्र असतात असा सुर यावेळी निघाला.कुंभार पिंपळगाव हे तालुक्यातील मोठ्या बाजार पेठेचे गाव आहे.बाजार पेठेला ४०ते ४५ गावे जोडलेली आहेत परंतु सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा ताफा कमी पडत आहे.कुंभार पिंपळगावला पोलिस ठाणे झाले पाहिजे या मुद्यावर पत्रकार आणि पोलिसांमध्ये एकमत झाले.या प्रसंगी समाजातील पत्रकार आणि पोलिसांची भुमिका या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर लोया, जेष्ठ पत्रकार सुरेशकुमार दाड, पोलिस उपनिरीक्षक सचिन कापुरे यांनी मत व्यक्त केले.
कार्यक्रमास व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय कंटुले,जेष्ठ पत्रकार इब्राहिम पठाण,लक्ष्मीकांत कुलकर्णी, लक्ष्मण बिलोरे, नितीन तौर,अजय गाडे, अशोक काळे , किशोर शिंदे, बाळासाहेब व्यवहारे, घुमरे, संभाजी कांबळे, कुलदीप पवार यांची उपस्थिती होती.पोलिस निरिक्षक शिवाजी बंटेवाड,कापुरे यांनी उपस्थित पत्रकारांचा यथोचित सत्कार केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दीगंबर गुजर यांनी केले.

*हे पण वाचा*

दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पत्रकारांशी चर्चा करताना घनसावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी सांगितले की, घनसावंगी पोलिस ठाण्याचा विस्तार मोठा आहे.तालुक्यात ९ बीट आहेत.कुंभार पिंपळगाव पोलिस चौकी अंतर्गत केवळ ३ बीट आहेत.कुंभार पिंपळगाव येथे पोलिस ठाणे व्हावे हि मागणी खुप दिवसांपासुन आहे.पोलिस हेडकॉन्स्टेबलच्या नियुक्त्या अपेक्षित आहेत.त्यासाठी सर्व स्तरातून पाठपुरावा होणे गरजेचे आहे.व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय कंटुले, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दीगंबर गुजर यांनी कुंभार पिंपळगाव येथे पोलिस ठाणे होण्यासंदर्भात आवश्यक त्या हालचाली करण्यात येतील असे सांगितले.