Home नांदेड सहायक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार यांचे हस्ते ध्वजारोहण.

सहायक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार यांचे हस्ते ध्वजारोहण.

241
0

मजहर शेख, नांदेड

• उप विभागीय अधिकारी कार्यालयातील मुख्य शासकीय कार्यक्रमासह किनवट परिसरात ‘ प्रजासत्ताक दिन’ उत्साहाने साजरा.

नांदेड/किनवट,दि:२६: -संविधान केंद्रित संस्कृतीतील सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय सण ” प्रजासत्ताक दिन ” येथील उप विभागीय अधिकारी कार्यालय व परिसरात उत्साहाने साजरा करण्यात आला.
सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण पुजार (भाप्रसे ) यांचे हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. यावेळी आ. भीमराव केराम, तहसिलदार उतम कागणे, गट विकास अधिकारी सुभाष धनवे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, उप विभागीय कृषी अधिकारी डी.एम. तपासकर, दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड, माजी नगराध्यक्ष के. मूर्ती, साजीदखान, माजी सभापती सोपानराव केंद्रे,माजी उपनगराध्यक्ष अभय महाजन, अनिल तिरमनवार,आदिवासी सेवक नारायणराव सिडाम , उपसभापती कपिल करेवाड, अशोक नेम्माणीवार, पुशुधन विकास अधिकारी डॉ. सायना आडपोड, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, डॉ. अशोक बेलखोडे, प्रा. किशनराव किनवटकर, सुरेश जाधव, मधुकर अन्नेलवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, स्वातंत्र्य सेनानी वारस श्रीमती सावते, सुरेखा काळे, आशा कदम, प्रीती मुनेश्वर, परवीन बेगम, गंगुबाई परेकार आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
उत्तम कानिंदे यांनी प्रारंभी संविधान उद्देशिकेचे वाचन घेतले व कार्यकमाचे सूत्रसंचाल केले. गायिका आम्रपाली वाठोरे कांबळे व सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या विद्यालयाच्या मुलींनी राष्ट्रगीत गायिले. पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक विजयकुमार कांबळे यांच्या नेतृत्वात सशस्त्र पोलिस पथकाने मानवंदना व सलामी दिली.

मतदार दिना निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील यशवंत : महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा येथील वैष्णवी नामदेव कुंभार (वक्तृत्व ), मयूरी मल्लीकार्जून स्वामी, सेजल संदीप जगताप (रांगोळी ) व सरस्वती विद्या मंदीर माध्यमिक शाळेच्या स्नेहा मनोज कांबळे (चित्रकला ) यांना व उत्कृष्ट कार्य केलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उल्हास सुदेगुनेवार, समीउल्लाखान, सटवाजी डोकळे, इम्रानखान करीमखान, शोभा जाधव व बाळकृष्ण वैद्य यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्रे प्रदान करण्यात आली.
संदीप यशीमोड यांच्या मार्गदर्शना खाली विद्यार्थ्यांनी कराटे प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नायब तहसिलदार मोहम्मद रफीक, के. डी. कांबळे, अशोक कांबळे, रामेश्वर मुंडे, शिवकांता होनवडजकर, गोविंद पांपटवार, राम बुसमवार यांनी पुढाकार घेतला.

पंचायत समिती, किनवट येथे ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिनानिमित्त किनवटच्या पंचायत समितीत व गट शिक्षणाधिकारी कार्यालयात अनुक्रमे सभापती हिराबाई लक्ष्मण आडे व उप सभापती कपिल करेवाड यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, गट विकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, पंचायत समितीच्या विविध विभागाचे प्रमुख, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख उपस्थित होते.