Mon. Jan 27th, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत जनजागृती मोहीम , अकोला शहर वाहतूक शाखेचा उपक्रम…..

अकोला , दि. 16 :- दिनांक 11/ 1/ 2020 ते 17/ 1/ 2020 पर्यंत रास्ता सुरक्षा सप्ताह साजरा करीत आहे . त्या अंतर्गत रोड अपघाताचे प्रमाण कमी करण्या साठी वाहन चालकां मध्ये जागृती यावी म्हणून सुरक्षित वाहने चालवा व आपला जीव वाचवा ह्या अभियाना अंतर्गत वाहतुकीचे नियम समजावून सांगण्यासाठी एकीकडे धडक मोहीम व जनजागृती सुरू आहे.

त्या अंतर्गत आज दिनांक 15 / 1 / 2020 रोजी अकोला शहरातील बस स्टँड, तसेच प्रमुख चौकात कॉर्नर मीटिंग आयोजित करून सुरक्षित रित्या वाहने चालवून आपण अपघात कमी करू शकतो त्या साठी कोणत्या महत्वाच्या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे तसेच असुरक्षित वाहने चालविण्याचे दुष्परिणाम सांगणारे माहिती पत्रक वितरित करण्यात आले, तसेच ऑटो व सायकल रिक्षा वर रिफ्लेक्टर लावण्यात आले , सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांचे मार्गदर्शना खाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके व वाहतूक कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

Posts Slider

AFTN Social

error: Content is protected !!