Home विदर्भ दिल्लीतील आदोंलणाची माहीती जिल्ह्यातील शेतकर्यापर्यन्त पोहचविणार.!

दिल्लीतील आदोंलणाची माहीती जिल्ह्यातील शेतकर्यापर्यन्त पोहचविणार.!

314

योगेश कांबळे

युवा संघर्ष मोर्चाच्या पदाधिकारी यांनी दिली पञकार परिषेदेतून माहिती.

वर्धा –  युवा संघर्ष मोर्चाच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आबेंडकर वाचनालय देवळी येथे पत्रकार परिषद आयोजित करून दिल्ली येथील सिंधू बॉर्डरवर सुरु असलेल्या आंदोलन सुरू असल्या बाबतची माहिती पञकार परिषदेमध्ये सांगितली.
गेल्या 40 -45 दिवसापासून सुरु असलेले दिल्ली येथील आंदोलन हे पंजाब, हरियाणा शेतकरी यांचे नसून ते संपूर्ण भारतातील शेतकर्याचे आहे.
माञ या आंदोलनाचा अपप्रचार भाजप, आर.एस. एस.कडून होत असून हे आंदोलणाचे स्वरूप बिघड विण्याचे काम भाजप आर.एस.एस. चे लोक करीत असल्याचा आरोप युवा संघर्ष मोर्चाच्या वतीने करण्यात आला
आहे.
आदोलण अयशस्वी कसे होईल या करीता वेगळा वेगळा हातखंडा भाजप वापरत असल्याचे पञकार परिषेदेत सांगण्यात आले.
देवळी शहरातील युवा संघर्ष मोर्चा चे दहा कार्यकर्ते दिल्ली येथे आदोलणात जावून सहभागी झाले होते.
आदोलणात तीन दिवस वास्तव करून तेथील परिस्थितीचे चिकित्सक निरीक्षण केले. आणी तीन दिवस प्रत्येक सदस्यांनी सेवा प्रदान केली. तेथील परिस्थिती इतकी विदारक असून इतक्या कड्याक्याच्या थंडीत सुद्धा घरातील 5-6 वर्षाच्या मुलापासून ते 80-85 वर्षाच्या वयोवृद्ध नागरिक ते महिला पासून या आंदोलनात सहभाग आणि सेवा प्रदान करीत आहे. या आंदोलनात सर्व निशुल्क जेवण गरम पाणी, चहा, कॉफी, कपडे धुण्यासाठी वेगळी व्यवस्था, कपडे शिवण्याची व्यवस्था, चप्पल पॉलिश व्यवस्था, वाचनालय मोबाईल चार्जिंग व्यवस्था, अशा अनेक जीवनावश्यक वस्तूची निशुल्क व्यवस्था येथे करण्यात येत आहे. तिथे पंजाब आणि हरियाणा या राज्यातील अनेक शेतकरी त्यात समावेश आहे. इतर राज्यातील शेतकरी सुद्धा या आंदोलनात सहभागी होत आहे. पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यात एम. एस. पी .मूळ मूल्य आधार किंमत हमीभाव लागू होती अशी कोणतीही कायद्याची शेतकरी बांधवांनी मागणी केलेली नाही, तरीपण केंद्र सरकारने हे निर्णय शेतकरी वर जबरदस्तीने झाले आहे असे पंजाबचे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे. या आंदोलनात सहभागी असलेल्या प्रत्येक नागरिक शेतकरी हा इतका निर्भीडपणे आहे त्यांच्या मनात कोणतेही भीतीचे वातावरण नाही. असे आंदोलन यापूर्वी कधीही झाले नाही आणि होणार नाही. ना.. भूतो.. ना भविष्य भविष्यो .. महाराष्ट्रातील शेतकरी या विधेयकावर अजून शांत कसा असा प्रश्‍न युवा संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला आहे. या आंदोलणाची माहिती या भागातील शेतकर्याना वत्तपञातून, इतर माध्यमांतुन व्हावी या करीता हे पञकार परिषेदेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सागितले. पञकार परिषदेला किरण ठाकरे,प्रविण काञे,गौतम पोपटकर,भुषण कडू आदी उपस्थित होते.