Home मराठवाडा अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी निधी संकलन संदर्भात जनजागृती दिंडी

अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी निधी संकलन संदर्भात जनजागृती दिंडी

401

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी

जालना –  जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे आज शुक्रवारी श्रीराम मंदिर उभारणी निधी संकलन संदर्भात जनजागृती पर दिंडी काढण्यात आली.प्रभू श्रीराम यांची जन्मभूमी अयोध्या येथे भव्य मंदिर उभारणी संदर्भात देशभरात जनजागृती सुरू आहे.मंदिर उभारणीमध्ये हिंदू धर्मातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग असावा म्हणून स्वइच्छेने निधी संकलन करण्यात येत आहे.यासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी कुंभार पिंपळगाव येथे दिंडी काढण्यात आली संपुर्ण गावात रांगोळी काढून दींडीतील प्रभूश्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रभूश्रीरामचंद्र कि जय जयघोषाने परिसर दणाणून गेला होता गावातील सर्व पक्षीय कार्यकर्ते ,भजनी मंडळ, युवा कार्यकर्ते यांनी हिरीरीने सहभाग घेतला होता.प्रत्येक हिंदू धर्मातील नागरिकांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी मध्ये आर्थिक मदत केली पाहिजे तसेच श्रीरामाने दुष्टांचा ,राक्षसांचा नायनाट करून त्रेतायुगात ऋषिमुनी,तसेच हिंदुधर्माचे रक्षण केले.हा संदेश घरोघरी पोहचविण्याचे कार्य जनजागृती दिंडीच्या माध्यमातून करण्यात आले.