Home नांदेड ग्रामपंचायत निवडणूकीसाठी किनवट तालुक्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत झाले 71.98 टक्के मतदान

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी किनवट तालुक्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत झाले 71.98 टक्के मतदान

72
0

मजहर शेख, नांदेड

नांदेड/किनवट,दि : १५:- किनवट तालुक्यातील एकूण 24 ग्रामपंचायती करिता एकूण 70 मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 71.98 टक्के मतदान झाले होते.
70 मतदान केंद्राकरिता 70 मतदान केंद्राध्यक्ष, 210 मतदान अधिकारी, 70 पोलिस कर्मचारी व 6 क्षेत्रिय अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. मतदान पथकास ने-आण करण्यासाठी 7 बसेस व 16 जीप आणि क्रुझरची व्यवस्था केली होती. स्त्री 13791 व पुरुष 14572 अशा एकूण 28362 मतदारांपैकी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत स्त्री 10251 व पुरुष 10166 अशा एकूण 20417 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार व तहसिलदार उत्तम कागणे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार अनिता कोलगणे, मोहम्मद रफिक, माधव लोखंडे, सर्वेश मेश्राम, निवडणूक लिपीक नितीन शिंदे, मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे, स्वामी मल्लिकार्जून, राम बुसमवार, रमेश मुनेश्वर, ग. नु. जाधव, योगेश वैद्य, रुपेश मुनेश्वर, विनय वैरागडे, गोविंद पांपटवार,प्रकाश टारपे, संदीप पाटील, देवकते, देवेंद्र क्षिरसागर, बी.आर. इंदुरकर, व्ही.टी. सूर्यवंशी, गणेश दुसाणे, मिलिंद टोणपे, रामेश्वर मुंडे, एम.एम कांबळे आदिंनी निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मारोती थोरात,सहायक पोलिस निरीक्षक सुशांत किणगे व संतोष केंद्रे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.