
रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील
भुसावळ शहर पत्रकार संस्थेच्या पदाधिकारी निवडीबाबत नुकतीच शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. या बैठकीत पत्रकार संस्थेच्या अध्यक्षपदी दैनिक ‘देशोन्नती’चे उपसंपादक प्रेम परदेशी यांची तर उपाध्यक्षपदी ‘दैनिक जनशक्ती’चे उपसंपादक गणेश वाघ व दैनिक देशदूतचे उपसंपादक आशिष पाटील तसेच सचिवपदी ‘दैनिक लोकमत’चे **हबीब चव्हाण* * यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला.











































