
योगेश कांबळे
वर्धा – भटके विमुक्त एस.बी.सी, वंचित समाज संघटन नागपुर व केदार लेआऊट सुधार समिती देवळी सयुक्त विद्यमानाने केदार लेआऊट वार्ड क्र.1 देवळी येथे शिक्षण जागर व लोकपंचायतीचे आयोजन करण्यात आले होते.
या लोकपंचायत कार्यक्रमात देवळीचे ठाणेदार नितीन लेव्हरकर यांचा कोरोना यौद्धा तर रमेश धुमाळ यांचा समाजिक कार्या बद्दल मुक नायक हे पुरस्कार देवुन यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन देवळीचे तहसिलदार राजेश सरोदे , भटके महासंघाचे अध्यक्ष मिलींद सोनुने, सकाळ चे नागपुर विभागाचे सह संपादक प्रमोद काळबांडे, बालरक्षक प्रसुन गायकवाड,देवळीचे नगरपरिषदेचे उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर, व देवळी सकाळचे तालुका बातमीदार शेख सत्तार उपस्थित होते.
यात भटके यांच्या दशा व दिशा यावर विचार मंथन करुन त्यांच्या समस्येचे निवेदन मिलींद सोनुने यांनी तहसीलदार यांना दिले. त्यात दफनभुमीचा प्रश्न,विधवा,निराधार,अपंग,एकल महीला,संजय गांधी निराधार योजनेचा प्रश्न,समाज मंदीर,अंगणवाडी,आधार,राशन कार्ड, मतदान कार्ड, महीला बचत गटास राशन दुकान देवुन स्वलंबनाचा प्रश्नाबाबत निवेदन देऊन प्रशासन यांना या समस्या सोडविण्याची विनंती करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रमोद काळबांडे यांनी तर ,प्रस्तावणा रमेश धुमाळ यांनी मांडली. आभार प्रदर्शन राहुलभारती यांनी केले.
या कार्यक्रमाच्या आयोजना करीता रमेश धुमाळ,राहुल भारती,जयाताई डवरे,जयाताई अळसपुरे,नितेश भाणारकर, शुभम राठोड कुणाल कन्नाके,रमेश सुरतकार,राजु चव्हाण,अशोक दांडगे,बारकु वाघाडे,गजानन मगर राजेश भोरे,रमेश नेहारे,विकास भोरे,प्रज्वल अळसपुरे,ओम डवरे,पारस डवरे मंथन धुमाळ यांनी परिश्रम घेतले.










































