
मजहर शेख, नांदेड
प्रहार दिव्यांग संघटनेला अखेर मोठे यश.
नांदेड/माहूर,दि : २३:- माहूर नगरपंचायत मधील दिव्यांग बांधवांचा ९ महिन्यापासून रखडलेल्या ५%/ निधी वाटप करण्यात आले.माहूर शहरातील दिव्यांग बांधवांना या लाँकडाउंन काळामध्ये गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागला पण नगरपंचायतने दिव्यांगानां ५% टक्के निधी वाटप केले नाही.म्हणून प्रहार संंघटनेने या अधिका-यांना तिन वेळा निवेदन देऊन सुद्धा दिव्यांग बांधवांना ५%टक्के निधी वाटप केले नाही.परंतु प्रहार दिव्यांग संघटना माहूरच्या वतीने दि,२२ डिसेंबर २०२०रोजी नगरपंचायत समोर उपोषणास बसण्याचे निवेदन दिले होते.त्यापूर्वीच दखल घेत तात्काळ माहूर नगरपंचायतने दिव्यांग बांधवांचा राखीव ५%निधी प्रहार दिव्यांग संघटनेच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी प्रहार संघटना माहूर तालुका अध्यक्ष, किशोर हुडेकर,शहराध्यक्ष, डॉ.बळवंत नागरगोजे सर रविंद्र बेहेरे,गणेश जाधव, जिया फारुकी,माहूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा,शितल मेघराज जाधव,उपनगराध्यक्षा आश्विनी आनंद पाटील तुपदाळे,नगरसेवक,दिपक कांबळे नगरपंचायतचे अधिकारी जोंधळे उपस्थित होते.











































