
योगेश कांबळे
●नवीन कृषी कायद्या विरोधात ग्रामसभेत ठराव घेण्याचे केले आव्हान.
वर्धा – दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात व तिन्ही नवीन कृषी कायदे रद्द व्हावे याची जनजागृती करण्यासाठी तसेच स्वामिनाथन आयोग लागू करण्याबाबत,हमी भावाचा कायदा बनविण्याबाबत व नवीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी ग्रामसभेत ठराव पारित करण्याचे आव्हान करण्यासाठी युवा संघर्ष मोर्चा देवळीच्या वतीने दुचाकीने शेतकरी संवाद यात्रेचे आयोजन दि. २०/१२/२०२० देवळी तालुक्यातील ग्रामीण भागात आयोजित केले होते.सकाळी ठीक ७ वाजता तिरंगा झेंडा दाखवीत यात्रा सुरू झालेली ही शेतकरी संवाद यात्रा ईसापूर, रत्नापूर, भिडी, शिरपूर, खर्डा, वाबगांव, बाभुळगाव, काजळसरा, वाटखेडा, कोल्हापूर, अंदोरी, आंजी, गौळ, दापोरी, पिंपळगाव, आंबोडा, गिरोली, चिंचाळा, अडेगाव, चिखली, बोपापूर,दिघी या गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला.
सदर संवाद यात्रेची सुरवात देवळी स्थानिक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.जवळपास २३ गावांमधील शेतकऱ्यांशी कृषी कायद्यावर संवाद साधत दुचाकी रॅलीने मार्गक्रमण केले.’जय जवान जय किसान’ व ‘भारत माता की जय’ या नाऱ्याने परिसर दणाणून टाकला.शेतकरी संवाद यात्रेतील तिरंगे झेंडे नागरिकांचे लक्ष वेधत होते.गावागावात शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी संवाद यात्रेचे मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले.शेतकरी संवाद यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर जावून चर्चा करण्यात आली.गावागावात शेतकऱ्यांशी संवाद साधून कृषी कायद्याने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान समजावून सांगण्यात आले. अनेक ठिकाणी सभेच्या माध्यमातून कृषी कायद्याबाबत अवगत करण्यात आले.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेतकरी संवाद यात्रेतील सहभागी झालेल्या नागरिकांची स्वयंस्फूर्तीने उत्तम अशी व्यवस्था करण्यात आली.प्रामुख्याने स्वामिनाथन आयोग लागू कारण्याबत,हमी भाव कायदा बनविण्याबाबत व नवीन शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्याबाबत ग्रामसभेत ठराव घेण्याचे आव्हान युवा संघर्ष मोर्चाच्या वतीने ग्रामस्थांना करण्यात आले.पारित केलेला ठराव महामहिम राष्ट्रपती व पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्याची जबाबदारी युवा संघर्ष मोर्चाने घेतली.
किरण ठाकरे,गौतम पोपटकर,प्रवीण कात्रे,गोपाल चोपडे,राम अंभुरे,वैभव नगराळे,विक्की बीजवार,गौरव खोपाळ,प्रवीण फटींग,निखिल नर्सिंगकर,चेतन इंगळे,कमलेश पाटील,बळीराम वैद्य,राम बासू,हारून तंवर,हनुमंत पचारे,कैलास ससाणे,उमेश बोरकर,अफसर,सचिन पडोळे,मयूर शेंडे,मनीष शेंडे,धनंजय भोयर,प्रशांत चहारे,सतीश राऊत,शैलेंद्र थुल,धनराज रिठे,आणि असंख्य युवा संघर्ष मोर्चाच्या पदाधिकारी शेतकरी संवाद यात्रेत सहभागी झाले.











































