
घनसावंगी- लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र उक्कडगाव येथील उत्तरेश्वर महादेव संस्थानचे मठाधिपती महंत डॉ.दीगंबर श्रीकृष्ण पुरी महाराज यांच्या मृत्यू मुळे जनतेत चर्चेला उधाण आले असून यामुळे महाराजांच्या आकस्मिक मृत्यूचे रहस्य वाढत आहे.जिल्हाभरात महाराजांच्या चाहत्यांमध्ये दुःख व्यक्त होत आहे.
महंत डॉ.दिगंबर श्रीकृष्ण पुरी महाराज घनसावंगी तालुक्यातील उक्कडगाव येथील उत्तरेश्वर महादेव मंदिर सानिध्यात मागील आठ वर्षांपासून वास्तव्यास होते.उत्तरेश्वरमंदिराचा कायापालट केला.परिसर सुशोभित केला.पुरी महाराज आपल्या कर्तृत्वाने जनतेच्या गळ्यातील ताईत बनले होते.गावोगावी मंदीर निर्माण,मुर्ती प्रतिष्ठापना करणे , गोदावरी परिक्रमा करणे,
आयुर्वेदीक उपचार पद्धतीने महाराज गोरगरिब रूग्णांवर मोफत उपचार करत, महाराजांनी अनेक तरूणांना व्यसनमुक्त करून सन्मार्गाला लावले.महंत डॉ.दिगंबर श्रीकृष्ण पुरी महाराज आदराचे,श्रद्धेचे स्थान बनले होते.
मिळालेल्या माहितीनुसार पुरी महाराज अलिकडच्या काळात काहीशे अस्वस्थ दिसत होते.मनमोकळेपणाने कुणाशी बोलत नव्हते,स्वभाव चिडचिडा बनला होता.याच अवस्थेत गेल्या पंधरा दिवसांपासून महाराज संस्थान बाहेर राहीले ,उक्कडगाव येथील ग्रामस्थांनी महाराजांना सुरक्षेसाठी त्यांचे गुरूबंधू त्र्यंबकेश्वर येथील महंत गणेशानंद महाराज यांच्या सान्निध्यात पोहचते केले. सांगितले जाते की याच काळात नाशिक येथे महंत गणेशानंद महाराज यांच्या सान्निध्यात असतांना पुरी महाराजांच्या मनातआत्महत्येचे विचार घोळत होते.गणेशानंद महाराज यांनी श्रीकृष्ण पुरी महाराज यांना औरंगाबाद येथे हलविले, पुरी महाराजांच्या भावाच्या स्वाधिन केले . महाराज तेथूनही मध्यरात्री घराबाहेर पडून शहरात भटकत राहिले सोमवारीे १४डिसेंबर २०२० रोजी अज्ञात व्यक्तीने पुरी महाराजांना औरंगाबादमध्ये घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. मंगळवारी १५ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान महाराजांचा मृत्यू झाला.जवाहर नगर पोलिसांनी
ओळख पटविण्यासाठी प्रसारमाध्यमांकडे प्रसिध्दी पत्रक सादर केले होते.गेल्या पाच दिवसांपासून महाराजांचा मृतदेह बेवारस अवस्थेत घाटी रुग्णालयात पडून होता.शुक्रवारी,१८ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पुरी महाराजांचा मृतदेह अॅंबुलन्सद्वारे अंत्यविधीसाठी उक्कडगाव संस्थानकडे पाठविण्यात आला.शुक्रवारी रात्री त्यांना समाधी देण्यात आली.डाॅ.दीगंबर श्रीकृष्ण पुरी महाराज यांच्या मृत्यूबाबत कुणीही ठामपणे बोलत नाही.महाराजांवर कुणाचा दबाव होता का ? उक्कडगाव संस्थानच्या विकासासंदर्भात कुणी हिशोब विचारून दडपण आणत होते काय ? संस्थानच्या जमिनीचा वाद होता काय? पुरी महाराजांनी मृत्यूला का कवटाळले ? महाराजांनी देहत्यागाचा निर्णय का घेतला ?सर्व काही रहस्यमय आहे.प्रश्न अनुत्तरित आहेत.वैद्यकिय अहवालात ह्रदय विकाराने निधन झाले असल्याचे सांगितले जाते.
शनिवारी दुपारपर्यंत महाराजांच्या समाधी स्थळी शुकशुकाट होता.बाहेरच्या लोकांनी संन्याशी बाबांच्या विधीकार्यात सहभागी होवू नये अशी
उक्कडगाव येथील ग्रामस्थांनी तटस्थ भूमिका घेतली आहे.महंत गणेशानंद महाराज आणि उक्कडगाव येथील ग्रामस्थांमध्ये मतभेद झाले असल्याचे दिसून आले.











































