Home विदर्भ ८ डिसेंबर ला शासकीय स्तरावर संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात...

८ डिसेंबर ला शासकीय स्तरावर संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी – ज्ञानेश्वर रायमल

189

यवतमाळ – महाराष्ट्र शासनाचा मागील वर्षी संताच्या जयंती पुण्यतित्या साजऱ्या करण्यात याव्या असे परिपत्रक काढले असून परिपत्रक जपुती/२२०८/१३३८पक्र.१०९/०८/सन२०१९ या परिपत्रका च्या सूचनेनुसार थोर राष्ट्रपुरुष थोर पुरुष जयंती व राष्ट्रीय दिन साजरा करण्यात यावा तेव्हा तेली समाज महासंघ जिल्हा यवतमाळ द्वारा विनंती करण्यात येते की तेली समाजातील थोर जगत गुरू तुकाराम महाराजांचे १४ टाळकरी व संत तुकाराम महाराजाच्या गाथा लीहणारे संताजी जगनाडे महाराज जन्म ८/१२/१६२४ ला पुणे जिल्हा तील चाकण येथे झाला असून आज सुदुंबरे येथे समाधी आहे महाराष्ट्र शासनाने पर्यटन क्षेत्र ब दर्जा देऊन घोषित केले असून संपूर्ण महाराष्ट्रात ८ डिसेंबर ला संताजी जयंती शासकीय स्तरावर प्रतेक शासकीय व खाजगी कार्यालयात साजरी करण्यात यावी असे आव्हान तेली समाज महासंघाचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर रायमल यांनी कळविले आहे