
यवतमाळ , दि. ०२ :- प्रजापती लॉन समोरील कच्च्या रस्त्यात अंधारात एका चारचाकी वाहनात तीघेजण हे बेकायदेशीरपणे खंजीर व दोन लोखंडी रॉड घेवून एखाद्या गुन्हा करण्याचे उद्देशाने लपुन बसले असता टोळी विरोधी पथकाने तिथे जावून त्यांना अटक केली. पोलीसांनी ही कारवाई दिनांक २ डिसेंबर रोजी केली.
शरद दशरथ गायधने (३०) रा.सिंचन नगर लोहारा यवतमाळ, प्रफुल कैलास लोखंडे (२३) रा.गुरुकुल अपार्टमेंट, दाते कॉलेज चौक यवतमाळ, प्रसाद मनोहरराव मालखेडे (२२) रा. सिंचन नगर लोहारा अशी टोळी विरोधी पथकाने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दिनांक २ डिसेंबर रोजी टोळी विरोधी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सारंग बोम्पीलवार व त्यांचे पथकातील कर्मचारी शहरात पेट्रोलींग करीत असतांना त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीवरुन प्रजापती लॉन समोरील कच्च्या रस्त्यात अंधारात एका चारचाकी वाहनात तीन आरोपी हे बेकायदेशीरपणे खंजीर व दोन लोखंडी रॉड घेवून एखादा गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपुन बसले असतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक सारंग बोंम्पीलवार व त्यांचे पथकातील कर्मचारी यांनी पंचासह तेथे जावून शहानिशा केली असता वरील आरोपी हे चारचाकी वाहकन क्र. एम.एच.०४ एच.एन. ३३४९ मध्ये लोखंडी मुठ असलेले खंजीर व दोन लोखंडी रॉड घेवून मिळून आल्याने पंचासमक्ष जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करुन आरोपींविरुध्द लोहारा पोलीस स्टेशनला कलम ४,२५ हत्यार कायदा, १२२, १२३ म.पो.का.अन्वये कार्यवाही नोंद करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक यवतमाळ डॉ.दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ.के.ए.धरणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सारंग बोंम्पीलवार, सहा्य्यक फौजदार ऋषी ठाकुर, इफराज काझी, नितीन खवडे, निखील मडसे सर्व टोळी विरोधी पथक यवतमाळ यांनी पार पाडली.
Post Views: 446










































