Home विदर्भ श्रीसंत लोटांगण महाराज चातुर्मास व याञा महोत्सव व दहिहंडी कार्यक्रम रद्द.!

श्रीसंत लोटांगण महाराज चातुर्मास व याञा महोत्सव व दहिहंडी कार्यक्रम रद्द.!

180

योगेश कांबळे

वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील गौळ येथील संत लोटांगण महाराज चातुर्मास व याञा महोत्सव कार्यक्रम कोरोणा वायरस च्या सावटामुळे रद्द करण्यात आल्याने भाविक भक्तांचा हिरमोड झाला आहे. वारकर्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने व स्थानिक प्रशासनाचे मार्ग दर्शक सुचनेच्या आधारे या वर्षी होणारा श्रीसंत लोटांगण महाराज चातुर्मास व याञा महोत्सव कार्य क्रम रद्द करण्यात आला आहे.
विश्वव्यापक विचारधारेची जोपासना करनारा, जगाला शांतीचा व समतेचा संदेश देणारा आणि समस्त वारकर्याचा प्रभाव अमुल्य ठेवा असा श्रीसंत लोटांगन महाराज चार्तूमांस व यात्रामहोत्सव प्रती वर्षी पमाणे या वर्षी दिनांक 13 डिसेंबर 2020 रोजी आयोजित होता.
परंतु यावर्षी जग संपुर्ण कोरोना वायरस च्या सावटात असल्यामुळे हा याञा महोत्सव कार्यक्रम रद्द करण्यातआला आहे. त्यामुळे महाप्रसाद दहीहांडी, दिंडी आदी कार्यक्रम होनार नाही. या याञेच्या निमित्ताने येथे येणार्या गावातील मुलिंच्या पंरपरेला प्रथमच छेद बसणार आहे.
या गावात दिवाळी दसर्या पेक्षा “ज्ञानेश्वरी पुण्यतिथी ” ला संपन्न होणार्या याञा महोत्सवाला महत्व दिले जाते. या दिवशी सर्व समाजातील लोक दहिहंडी कार्य क्रमात सहभागी होवून माणूस आमची जात म्हणून इतर गावातील लोकांना प्रत्यय देतात. असा हा महोत्सव
प्रतीवर्षी होणारा श्रीस्ंत लोटागण महाराज चातृमास व वात्रामहोत्सव सोहळा रद्द झाल्याने याची सर्व वारकरी मंडळींनी यात्रेकरिता येणारे दुकानदार मंडळीनी नोंद घ्यावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रामदास पवार व उपाध्यक्ष नरेश घोंगे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.