Home विदर्भ तळेगांव च्या “मेवा” अपघात प्रकरणात आले वेगळेच वळण…!

तळेगांव च्या “मेवा” अपघात प्रकरणात आले वेगळेच वळण…!

217

तळेगाव शामजी पंत  – रविन्द्र साखरे

वर्धा –  अपघात ग्रस्त गाडीतील मालाची अफरातफर केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी लावलेल्या शोधात अजब किस्सा पुढे आला आहे. या चौघांनी वाहन मूर्तिजापूर ला आणून तेथे वाहनांची नंबर प्लेट चेंज करून वाहनातील काही मालाची अफरातफर केली होती.

कारण तळेगांव नजीक ट्रक पलटी झाल्यानंतर त्यातील काही सुका मेवा परिसरातील नागरिकांनी लंपास केला होता, पण फिर्यादी मालकांनी या मालाबाबत व अपघाताबाबत संशय उपस्थित केल्यामुळे पोलिसांनी फिरविलेल्या अती जलद चक्रामुळे आरोपींच्या मुसक्या आवळण्यात तळेगांव पोलिसांना यश आले आहे.
पोलीसांनी तीन आरोपीना अगोदर ताब्यात घेऊन त्यांचा सात दिवसाचा पी सी आर न्यायालयात मागितला होता. पण न्यायालयाने दोन दिवसांचा पी सी आर दिल्याने पोलिसांनी तपासाची गती अधिक
या सर्व प्रकरणात अचंबित करणारी बाब पुढे आली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार APMC नवी मुंबई येथून माल वाहनात भरल्यानंतर यातील नासिर व वसीम नामक इसमाच्या मदतीने मूर्तिजापूर मध्ये मालाची अफरातफर केली असल्याचे कबुल केले आहे. यावेळी अंदाजे 8 टन मालाची अफरातफर केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. यामध्ये आणखी पुढे पाऊल टाकत या प्रकरणाचे नागपूर कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाल्याने नागपुर येथे पोलिसांच्या तीन पथकाने पोलीस निरीक्षक जितेंद्र चांदे यांच्या मार्गदर्शनात रेड केली. यावेळी आरोपी हा घरी नव्हता तेव्हा त्याला मोठ्या शिताफीने नागपूर येथून ताब्यात घेतलयाने त्यांनी गाडीतील सुकामेव्याचा माल नांदेड येथे विकल्याचे पुढे आले त्यानुसार पोलिसांनी तातडीने रात्रीलाच नांदेड येथे धाड टाकून शेख समीर उर्फ अट्टू याच्या कडून 94.5 बदामाचे कट्टे जप्त करून तब्बल 2500 किलो बदाम जप्त केली. ही कार्यवाही नांदेड येथील अर्धापुर येथे पोलिसांनी केली.आतापर्यंत 28 लाखाचा माल पोलिसांनी जप्त केला आहे आणी यामध्ये सहा आरोपी सुद्धा ताब्यात घेतले आहे.