Home विदर्भ महाविकास आघाडीचे उमेदवार डाॅ.श्रीकांत देशपांडे यांची थेट लढत डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक...

महाविकास आघाडीचे उमेदवार डाॅ.श्रीकांत देशपांडे यांची थेट लढत डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे सतीश काळे यांच्या सोबतच

49
0

शिक्षक मतदारांची प्रथम पसंती शिक्षकच…!

यवतमाळ – अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील येत्या १ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ तारखेपासून मतमोजणी प्रक्रिया सुरुवात होणार आहे.मतदार संघात अनेक शिक्षक संघटनेचे उमेदवार पाल ठोकून आहेत परंतु पहिल्यांदाच राजकीय पक्षांनी थेट मतदार संघात उडी घेतली आहे भाजपतर्फे विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डाॅ. नितीन धांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अमरावती,अकोला,यवतमाळ,बुलढाणा,वाशीम या पाच जिल्ह्यांमध्ये युद्ध पातळीवर उमेदवार सक्रिय झालेले आहे.
गेल्या दहा वर्षापासून विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डाॅ.नितीन धांडे असून अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्था नंतर ही सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असल्याचे मानले जाते.
मात्र दोन्ही ही राजकीय पक्षाचे उमेदवार हे शिक्षणसम्राट असल्यामुळे शिक्षक मतदारांमध्ये या दोन्ही उमेदवाराबाबत साशंकता निर्माण झाली असून या निवडणुकीत शिक्षक सम्राटांना शिक्षक मतदार नाकारणार असे स्पष्ट दिसत असताना डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे महासचिव व शिक्षक सतीश माधवराव काळे तसेच डाॅ.श्रीकांत देशपांडे यांच्यात थेट लढत होतानाची दिसत आहे. कारण अमरावती शिक्षक मतदारसंघात सध्या शिक्षक आघाडीचे संस्थापक डॉ.श्रीकांत देशपांडे विद्यमान अंधार असले तरी मागील निवडणुकीत निवडून आल्यानंतर शिक्षकांना वाऱ्यावर सोडले असून त्यांच्या कुठल्याही प्रश्नांना वाचा फोडली नसल्याने शिक्षकांमध्ये तीव्र काळजी व्यक्त होत आहे तर दुसरीकडे सतीश माधवराव काळे हे डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे संघटनेचे प्रदेश महासचिव असून वसंतराव नाईक विद्यालय चिखली येथे म्हणून कार्यरत आहे.त्यांनी यापूर्वी संघटनेच्या माध्यमातून शिक्षण सेवकांच्या मानधनचा प्रश्न निकाली काढला,शिक्षण सेवक हे नाव शिक्षकांचा अवमान करणारे आहे म्हणून शिक्षण सेवक हे नाव दिलेले नाव बदलण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असून आता परिविक्षाधीन सहाय्यक शिक्षक असे नाव विधान शिक्षक सेवकाला करण्यात आले आहे झालेले वेतनेतर अनुदान संघटनेच्या माध्यमातून केलेल्या आंदोलनामुळे पूर्ववत सुरू केले, नैसर्गिक वाढीने मिळालेल्या वर्ग तुकड्यांमधील शिक्षकांना वेतन अनुदान मिळावे यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली,विनाअनुदान तत्त्वावरील शाळातील शिक्षकांना अनुदान मिळावे या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात काळात आंदोलने केली जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करण्यासाठी यवतमाळ ते नागपूर पायी दिंडी काढली तसेच या दिंडीचे नेतृत्व सुद्धा त्यांनी केले वरिष्ठ निवड श्रेणी व निवड श्रेणीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले शिक्षकांच्या पाल्यांना व्यावसायिक शिक्षणामध्ये मोफत शिक्षण मिळवून देण्यासाठी आजही ते प्रयत्नरत आहे करिता शिक्षकांचे अनेक प्रश्न व शिक्षण क्षेत्रात नव्याने निर्माण झालेल्या अनेक समस्या प्रलंबित असून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विधिमंडळात जाऊन शिक्षकांच्या वाचा फोडण्यासाठी शिक्षक मतदार सतीश माधवराव काळे यांना नक्कीच संधी देणार ही परिस्थिती निर्माण झाली असून थेट लढत श्रीकांत देशपांडे तसेच सतीश माधवराव काळे यांच्यामध्ये होतांना दिसत आहे.