
विरोधकांवर आक्रमण करण्याची तयारी करण्या सोबतच आपल्या सैन्याच्या बलस्थानांचा विचार करून योग्य वेळी हल्लाबोल करण्याची तयारी ठेवणे हे कुशल सेनानीचे लक्षण आहे.शत्रू जेव्हा पूर्ण ताकदवर असतो, उन्माद करीत असतो तेव्हा आक्रमणासाठी योग्य संधी केव्हा चालून येऊ शकते ह्याची वाट नेहमी कुशल सेनानीला पहावी लागते.महाराष्ट्र राज्य हे शिवछत्रपतींचे राज्य आहे त्यामुळे आक्रमण करतांना योग्य संधीची वाट कशी पहिली जाते आणि योग्य वेळी निर्णायक आक्रमण कसे केले जाते हे महाराजांनी अफजलखान वध आणि शाहिस्तेखानावर हल्याद्वारे सोदाहरण इतिहासात आपल्याला दाखवून दिले आहे.शिवसेना पक्ष हा शिवछत्रपतींच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे आणि त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुखांची नीती पाहता या ऐतिहासिक घटनांची आठवण आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही.
गेल्या एक वर्षात बऱ्याच काही घटना घडून गेल्या आहेत.’मी परत येणार’ पासून तर मागील दिवाळी पूर्वी मुंबईला वर्षा निवासस्थानी पत्रकाराबरोबर चर्चेत शिवसेनेला मुख्यमंत्री पदाचा शब्दच दिला नव्हता असे सांगणारे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विरोधी पक्ष नेते आहेत.विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे कमी आमदार निवडून यावे म्हणून कदाचित शिवसेना उमेदवारांविरोधात भाजपनी जो गनिमी कावा केला त्यामुळे कदाचित असेल पण राजकीय विश्लेषकांच्या कधीही ध्यानीमनीही नव्हते असे पाऊल पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी निवडणूक पश्चात घेतले.अशक्य वाटणारे महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात 27 नोव्हेंबरला स्थापन झाले.अशे सरकार स्थापन होऊ शकते असा विश्वास तिन्ही पक्षातील अनेकांना नव्हता पण आज महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे आणि वर्षपूर्तीकडे विश्वासाने वाटचाल करीत आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांना प्रशासकीय अनुभव नसल्याने राज्याचा गाडा हाकणे जमणार नाही असा कांगावा विरोधकांनी केला.पण विधानसभेतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण,कोरोना काळात त्यांनी घेतलेले निर्णय,कोकणातील निसर्ग चक्रीवादळ पूर्व त्यांनी आखलेली व्यूहरचना भल्याभल्यांना अचंबित करून गेली.कंगना राणावत व सुशांतसिंग राजपूत व नेव्ही मार्शल मारहाण प्रकरण मुख्यमंत्र्यांनी लीलया हाताळले.अर्णव गोस्वामी अटक प्रकरणी जे आक्रमण सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने दाखवले त्यामुळे विरोधकांमध्ये चलबिचल आता सुरू झाली आहे.
निवडणूक पूर्व काळात विविध पक्षातून भाजपमध्ये जबरदस्त इनकमिंग झाले व पुढील पाच वर्षे आपणच मुख्यमंत्री राहू असे गृहीत धरून देवेंद्र फडणवीसांनी येणाऱ्या प्रत्येकाला राजकीय पुनर्वसनाचे शब दिले होते.मंत्रीपदे,महामंडळ आणि संघटनात्मक पदांचा शब्द घेतल्या शिवाय ह्या नेत्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला नव्हता हे जगजाहीर आहे.पण अचानक पाटी फिरली आणि आता देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात आहेत.त्यांचे जवळ विरोधी पक्ष नेत्यांचे अनुषंगाने लाल दिवा आहे पण लाल दिव्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांचा आणि खास करून निवडणूक पूर्ण भाजप मध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांचा पुरेपूर हिरमोड झाला आहे.त्यांचे मधील असंतोष थोपवून ठेवण्यासाठी दर दोन महिन्यांच्या अंतराने महाविकास आघाडी सरकार पडणार अश्या बातम्या भाजप कडून पेरल्या जातात.पक्षातील असंतोष थांबविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार पडून भाजप सरकार येण्याच्या विविध तारखा भाजप नेत्यांद्वारे दिल्या जातात आणि असंतोष काही अंशी कमी केल्या जातो.
पण अर्णव गोस्वामी प्रकरणी व खास करून बिहार निवडणुकी नंतर ज्या प्रकारे शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजप विरोधी आक्रमक भाषा वापरली त्यामुळे भाजप मध्ये आणि खास करून भाजप मधील धुरीणांमध्ये आता अस्वस्थता पाहायला मिळत आहे.महाविकास आघाडी सरकार वर्षपूर्ती करीत आहे आणि स्थिरावतेय.लवकरच महामंडळाचे वाटप होणार आहे आणि त्यामध्ये सत्ताधाऱ्यांमधील अनेक मंत्रिपद न मिळालेल्या नेत्यांचे पुनर्वसन होणार आहे.पर्यायाने सरकार अधिक मजबूत होणार आहे.आणि ज्या मजबुतीने आणि आत्मविश्वासाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकार वाटचाल करीत आहे ते बघता हे सरकार सध्या पडण्याचे कुठलेही लक्षण दिसत नाही.कोरोना संकट दिवसेंदिवस कमी होतेय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार ह्याच गतीने काम करीत राहिले तर वर्षभरात महाराष्ट्रात होणाऱ्या महापालिका,नगर परिषद,जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपचा टक्का मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.जीवन में असली उड़ान अभी बाकी है,
हमारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है बस मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है।लेखक
पराग पिंगळे
शिवसेना जिल्हा प्रमुख
यवतमाळ










































