Home जळगाव मौलाना- इमाम यांच्या मानधनात वाढ- तर गाळे हस्तांतरण साठी मोजावे लागणार रुपये

मौलाना- इमाम यांच्या मानधनात वाढ- तर गाळे हस्तांतरण साठी मोजावे लागणार रुपये

127

मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह विश्वस्त मंडळ सभेत १५ विविध ठराव संमत

रावेर (शरीफ शेख)

जळगाव मुस्लिम कब्रस्तान व ईद गाह ट्रस्ट च्या कार्यकारिणीची सभा ट्रस्टचे अध्यक्ष गफ्फार मलिक यांच्या अध्यक्षतेखाली ईद गाह ट्रस्टच्या ऑफिसमध्ये पार पडली त्यात पंधरापैकी बारा संचालक उपस्थित होते.

सर्वप्रथम जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी मागील सभेचे इतिवृत्त सादर केले ते मंजूर करण्यात आले, वार्षिक जमा खर्च चे ऑडिट रिपोर्ट सादर करण्यात आले त्यात एकूण रुपये वीस लाख १९ हजार ६४३ रुपये तर खर्च १७ लाख ७२ हजार ८५७ झाला अशाप्रकारे ट्रस्टला २ लाख ४६ हजार ८८५ रुपयाचा फायदा झाला.
वार्षिक अहवालाचे वाचन करून त्याला ही मंजुरी देण्यात आली. वार्षिक सर्वसाधारण सभा ही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे निश्चित करण्यात आले.

गाळे हस्तांतरण व मौलाना यांचे मानधन निश्चित साठी चर्चा व मान्यता

गाळे हस्तांतरणासाठी अर्ज प्राप्त झाले असून त्यासाठी निश्चित अशी कार्यप्रणाली नसल्याने ती निश्चित करण्यात आली पुढील,मागील व मधील गाळ्यासाठी हस्तांतरण फी ५० हजार ते एक लाख रुपये ही हस्तांतरण फी ठरवण्यात आली.

गाळे हस्तांतरण साठी फारुक शेख ,मजहर खान व अनिस शाह यांच्या समितीला फी आकारणी दर निश्चितीचे अधिकार देण्यात आले.
मौलाना-मौज्जन मानधन

४० मशिदीचे इमाम व मौज्जन यांना देण्यात येत असलेले चारशे व तीनशे रुपये प्रत्येकी मानधनात वीस वर्षा नंतर वाढ करण्यात आली. ४०० रु चे ५०० रु तर ३००रु चे ४०० रु वाढ होऊन पाचशे रुपये वाढ करण्यात आली.
बगीचा-पाणपोई व कारंजे

सौंदर्यी करण अंतर्गत ईदगाह कंपाउंड च्या समोर पाणपोइ, कारंजा व बगीच्या या उभारणीच्या कामाला मान्यता देण्यात आली.
दवाखाना-विश्राम व वृधाश्रम ची निर्मिती

दुसऱ्या माळ्यावर हॉल, दवाखाना, वृद्धाश्रम व विश्राम गृह ची निर्मिती शॉपिंग कॉम्प्लेक्स वरील दुसऱ्या माळ्यावर विविध औद्योगिक व सामाजिक संघटना या संस्थांच्या वतीने अथवा सामाजिक संघटना च्या संयुक्त विद्यमाने ना नफा ना तोटा या तत्त्वावर दवाखाना तयार करणे, बाहेरगावाहून आलेले विद्यार्थी व पाहुण्यांसाठी विश्रामगृहाची निर्मिती, करणे समाजातील वृद्ध ज्यांना घरच्या मंडळींनी नाकारले त्यांना एका ठिकाणी ठेवणे अशा नावीन्यपूर्ण योजना येत्या भविष्यकाळात पूर्ण करण्यासाठी त्यांचा ब्ल्यू प्रिंट सभेसमोर ठेवण्यात आला होता तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
संस्था व दाते यांना आव्हान
कारंजे,पाणपोई,बगीचा,दवाखाना, विश्राम गृह, ही कामे संस्था व दाते यांच्या कडून घेतली जाईल व त्यांची नावे देण्यात येणार असल्याने संस्थांनी- दाते यांनी ११ ते ५ च्या दार्मियां ईद गाह ऑफिस अथवा फारूक शेख ९४२३१८५७८६ यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान गफ्फार मलिक यांनी केले आहे

वक्फ बोर्डात महाराष्ट्रात जळगाव इदगाह ट्रस्टआघाडीवर

जळगाव मुस्लिम कब्रस्तान इद गाह ट्रस्ट यांचा वार्षिक ऑडिट रिपोर्ट १९-२० चा सादर करण्यात आला अंशदान रक्कमसुद्धा भरणा करण्यात आलेला आहे.

सभेत या संचालकांचा होता सहभाग
अध्यक्ष गफ्फार मलिक, उपाध्यक्ष सय्यद मुशताक अली हैदर अली , रियाझ मिर्झा, खजिनदार मोहम्मद अश्फाक बागवान, जनरल सेक्रेटरी फारुक शेख ,जॉइंट सेक्रेटरी शेख मुकिम व अनिस शाह, संचालक ताहेर शेख,मजहर खान, नजीर मोहम्मद व ॲडव्होकेट शेख सलीम यांची उपस्थिती होती

सभेचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार फारुक शेख यांनी व्यक्त केले.